ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

एवढा महाग प्रवास ? एसटी पेक्षा खासगी वाहन परवडले…

अहिल्यानगर

राज्य परिवहन महामंडळाने एसटी बसच्या तिकीट दरात १४.९७ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला असून ही भाडेवाढ २५ जानेवारी पासून लागू झाली आहे.त्यामुळे नगर-पुणे प्रवास २७ ते ३४ रुपये महागला आहे.नगर-पुणेसाठी साध्या बसचे तिकीट आता २०२, तर शिवशाहीचे तिकीट २८४ रुपये झाले आहे.

राज्य परिवहन प्राधिकरणाची बैठक शुक्रवारी मंत्रालयात पार पडली.त्या बैठकीत एसटीसह रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला.एसटीची भाडेवाढ गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती.

डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढत असल्याने भाडेवाढ दरवर्षी होणे अपेक्षित असते.मात्र मागील ३ ते ४ वर्षांपासून एसटीची भाडेवाढ झाली नव्हती.त्यामुळे आता एकत्रित १४.९७ टक्के इतकी भाडेवाढ करण्यात आली असून ती शनिवार पासून लागू होईल,असे महामंडळाने कळवले आहे.

प्रतिटप्पा १० ते १४ रूपये भाडेवाढ एसटीने केलेली ही भाडेवाढ २५ जानेवारीपासून लागू झाली आहे.सुधारित दरानुसार आता साधी व जलद, तसेच रातराणी बस सेवेला एका टप्प्याला १०.५ रूपये, वातानुकूलित शयन आसनी बसला १३.६५, तर शिवशाही बसला १४.२० रूपये प्रतीटप्पा दर आकारला जाणार आहे.

अहिल्यानगर-सोलापूर- साधी बस ३९३ (३४०) – निमआराम ५३३ (४६५)

अहिल्यानगर-कल्याण – साधी बस – ३६३ (३१५ – निमआराम ४९२(४२५)

अहिल्यानगर-नाशिक – साधी बस २९२ (२५५) – निमआराम ३९७ (३४५

अहिल्यानगर-पंढरपूर – साधी बस – ३३३ (२९०) निमआराम ४५१ (३९०)

अहिल्यानगर-पुणे – साधी बस – २०२ (१७५) निमआराम २७४ (२४०)

अहिल्यानगर-मुंबई – साधी बस ४७३ (४१०) निमआराम ६४३ (५६०)

अहिल्यानगर-संभाजीनगर – साधी बस २०२ (१७५) निमआराम २७४ (२४०)

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे