हिरकणी सौ. गीतांजली योगेश वाणी. राहणार – गोरेगाव यांचा मातृदिन विशेष लेख..
मुंबई - गोरेगाव

शीर्षक माझ्या गृहीत दैवतला नमन.
जीवनात जगताना
बहू लाभती आप्तेष्ठ
माय माऊली माझिया
अनंतात तूच श्रेष्ठ…
प्रत्येकाला जन्म देऊन जगात आणणारी, निरपेक्ष जीव ओतून माया करणारी आई सर्वांनाच प्रिय असतें. मलाही माझी आई तशीच अतिप्रिय आहॆ. आई वडील सर्वांचेच खास असतात पण माझ्या आईची बातच न्यारी.
कलियुगातील झाशीरी राणीचं आहॆ जणू. ती स्वतः वैभव संपन्न कुटुंबात लहानची मोठी झाली तरी लग्नानंतर सासरच्या परिस्थितीनुसार स्वतःला सामावून घेतलं पण आम्हाला कधी काही कमी पडणार नाही याची काळजी अजूनही घेते आहॆ. तिचं प्रेम असं शब्दात व्यक्त करण्याच्या पलीकडे आहॆ. पण तिला मी कायम गृहीत धरत आले आहॆ.
मी लहान असताना मला कुणाची भीती वाटली किंवा राग आलातर तू जसं म्हणायची की…. आपण त्याचं घर उन्हात बांधू तस मला तुझ्या आयुष्यातील अडचणींना म्हणता आलं असतं आणि मी ही तुझी समजूत घालू शकले असतें तर किती बरं झालं असतं ना.
आजपर्यंतच्या सगळ्या म्हणजे सगळ्या चुका, सगळे बोलणे, वागणे सहजतेन ती सानवून घेते…. मी तिला गृहीत धरल्याचा त्रासही झाला तरी हसून म्हणते तू माझी मुलगी आहेस ना… तुझा हक्क आहे आईवर. ती असं म्हणाली तरी डोळे पाणवतात. तिचं असणारं प्रेमरूपी ऋण कधीही न फिटणार आहॆ. कधी कधी खूप भावनिक व्हायला होत. पण तिच्याशी अजाणते, जाणतेपणात नाईलाजाने कधी खोटं बोलले असेल तर त्यासाठी मनापासून सॉरी म्हणावंसं वाटल. तुझी मुलगी असल्याचा सार्थ अभिमान आहॆ. तुझी सावली खूप मोठा आधार आहॆ.
तुझ्या सावलीची ऊब
डोह आनंद तरंग
लेक तुझी सांगताना
उजळते अंतरंग