ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अतिक्रमणांवर हातोडा..‘त्या’ रस्त्यांचा श्वास मोकळा

अहमदनगर

गेल्या आठ दिवसांपासून नगर शहर व उपनगरातील अतिक्रमणांवर कारवाई केली जात आहे. सोमवारी कोठला परिसर, कोंड्यामामा चौक, फलटण चौकी परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली.

सोमवार दि. 16 डिसेंबरपासून शहर व उपनगरातील अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्यास महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सुरुवात केली आहे.

यापूर्वी महापालिका प्रशासनाने अतिक्रमण धारकांना अतिक्रमण काढून घेण्याच्यासुचना दिल्या होत्या. काहींनी अतिक्रमणे काढून घेतली परंतु अतिक्रमणे काढून न घेतलेल्यांवर मनपाने कारवाई करण्यास सुुरुवात केली आहे. शहरासह उपनगरातील रस्त्यांचा श्वास मोकळा केला आहे.

सोमवारी रोड लगत असणारे लोखंडी बोर्ड, कुरेशी हॉटेल बोर्ड हटवण्यात आला, तसेच मावा, फिटर टपरी, शेड लोखंडी पत्रे ,चहा स्टॉल शेड व टपरी हटवण्यात आली.

कोंड्या मामा चौक ते राज चेंबर कोटला रोड च्या दोन्ही बाजूला असणारे टपऱ्या, हातगाड्या, वडापाव चहा टपरी, शेड हटविले. फलटण चौकी लगत असणारे अतिक्रमणांवर कारवाई केली. यावेळी प्रभाग अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी, अतिक्रमण पथकाचे कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे