शब्दशिल्प कलाविष्कार संघातर्फे संक्रांती २०२५ तिळगुळ आणि ज्ञानदायी वाण समारंभ थाटात संपन्न
गोरेगाव - मुंबई

शब्दशिल्प कलाविष्कार संघ नोंदणीकृत संस्था साहित्यिकांना प्रोत्साहन देणारे निरनिराळे उपक्रम नेहमीच राबवत असते.
वर्षं २०२५ च्या संक्रांती सणाला संस्था सभासद महिला साहित्यिकांनी एकमेकांना ग्रंथरूपी (पुस्तक ) ज्ञानदायी वाण म्हणून द्यावे आणि ते देतानाचा फोटो त्यावर चारोळी लिहून सहभाग नोंदवावा ..असे आवाहन कार्याध्यक्षा हिरकणी गीतांजली वाणी यांच्या संकल्पनेतून समस्त शब्दशिल्प नवरंग आयोजक वतीने शब्दशिल्प सदस्य महिला परिवाराला करण्यात आले होते. आणि त्यानुसार तरुण, वयोवृद्ध सर्वच महिलांनी आध्यात्मिक, तथा वैचारिक ग्रंथ जसे भगवद्गीता, प्रार्थना, वपुर्झा आणि काव्यांगी, भक्तीचा परिमळ असे काही काव्यसंग्रह, काही पाककृती ग्रंथ असे विविध प्रकारचे ग्रंथ संक्रांत वाण देऊन आनंद घेतला.
विशेष करून दोन नववधू डॉ.तेजल अजिंक्य आंबोकर आणि सौ. सायली संकेत कोठावदे यांनी ह्या उपक्रमात सहभागी होऊन हा साहित्यिक वारसा असाच वृद्धिंगत करण्याची इच्छा व्यक्त केली. डॉ. तेजल ह्या डॉक्टर असूनही ज्ञान वृद्धीसाठी उत्साह दाखवणारी तरुण पिढी हे कौतुकास्पद आहे. शब्दशिल्प परिवार नेहमी निरनिराळ्या उपक्रमातून आनंद निर्माण करत असतो…. दोघी नववधू समवेत ज्ञानदायी संक्रांत वाण साजरा करून आपण साहित्याचा वारसा जपण्याची, वृद्धिंगत करण्याची परंपरा तुम्ही अशीच पुढे न्या असा संदेश त्यांना दिला आहे. विशेष म्हणजे सौ. सायली आता तो संदेश परदेशी पोहोचवणार आहे.. त्यामुळे उपक्रम आंतरराष्ट्रीय स्तराचा झाला आहे. शब्दशिल्प संक्रांत समारंभ उपक्रमात आवर्जून विधवा महिलांना सन्मानाने सहभागी करून आणि समस्त स्त्री जातीने तो आनंद घ्यावा या उद्देशाने उपक्रम आयोजन केले जाते.
वर्षं २०२२ साली देखील अशाच प्रकारे चंदनाक्षरी ई – काव्यसंग्रहाचे प्रकाशन तिळगुळ समारंभात करून तो वाण स्वरूपात दिला होता. सातत्याने हे उपक्रम आयोजन यशस्वी करण्यासाठी समस्त शब्दशिल्प नवरंग आयोजक हिरकणी गीतांजली वाणी, सपना भामरे, मयूर पालकर, मिनल बधान, चंदन तरवडे, अर्चना नावरकर, प्रियांका कोठावदे उत्साहाने कार्यरत असतात. संक्रांत वाण उपक्रमाच्या फोटोचे आकर्षक कोलाज विनिता कोठावदे यांनी सुरेख करून दिले. ज्येष्ठ साहित्यिका रंजना बोरा यांच्या मनपर्ण काव्यसंग्रहाचे प्रकाशन संक्रांतीच्या दिवसात होऊन ज्ञानदायी वारसा जोपसण्याचे कार्य अविरत सुरु ठेवण्याचा उद्देश सफल होत आहे.