
पुण्यातील चांदणी चौकातील प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाचे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज शनिवार 12 ऑगस्ट रोजी उद्घाटन होणार आहे.
पुणे – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे चांदणी चौकात सतत होणारी वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.