ब्रेकिंगमहाराष्ट्र
म्हाडाची आज शनिवारी सोडत

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ५३११ घरांच्या सोडतीचा निकाल आज शनिवार २४ फेब्रुवारी २०२४ रोजी जाहीर होणार आहे.
सोडतीचा निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया सकाळी दहा वाजल्यापासून ठाणे येथील राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहात सुरू होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत संगणकीय सोडतीचा निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. या सोडतीसाठी २५ हजार ७८ अर्जदार पात्र ठरले आहेत.
सोडतीला केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई उपस्थित असतील.