ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

यंदा १० हजार घरांमध्ये मातीच्या गणेशाची प्रतिष्ठापना

सोलापूर

महाराष्ट्राचा लोकोत्सव असलेल्या गणेशोत्सवाची आतुरता आता संपली. उद्या घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांच्या ठिकाणी श्रीगणेश मूर्तीची प्रतिष्ठापना होईल. बाप्पांच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू झाली. बाजारपेठा सजल्या. मूर्तीची निवड कशी करावी, त्याची प्रतिष्ठापना किती वाजता करावी आणि पूजन कसे करावे, या गोष्टी सांगत आहेत पंचांगकर्ते मोहन दाते. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना सोलापूरकरांमध्ये बऱ्यापैकी रूजली. यंदा १० हजार घरांमध्ये मातीच्या गणेशाची प्रतिष्ठापना होईल, असे चित्र आहे.

ही संकल्पना रुजण्यामागे तीन कारणे िदसून येतात- पहिले शाळांमध्ये सुरू झालेल्या कार्यशाळा, दुसरे चिमुकल्या हातांनी तयार झालेल्या मूर्तीच घरात प्रतिष्ठापना करण्यासाठी पालकांचा पुढाकार अन् तिसरे कारण आहे बाजारात आलेल्या मातीच्या सुबक मूर्ती आणि सामान्यांच्या आवाक्यातील त्यांचे दर. याचा एकूण आवाका घेतला तर यंदाच्या वर्षी शहरात सुमारे १० हजार घरांमध्ये मातीच्या गणेशाची प्रतिष्ठापना होण्याची शक्यता आहे.

मूर्तीत या गोष्टी पाहा

१ गणेशाची मूर्ती एक ते दीड फुटांपेक्षा जास्त उंचीची नसावी.

२ एकदंत, चतुर्भुज, पाश आणि अंकुश धारण केलेली असावी.

३ मूर्तीच्या एका हाती मोदक अन् दुसरा हात वरदमुद्रेत असावा.

४ पाटावर, सिंहासनावर विराजमान.

पार्थिव गणेशासाठी नाही विशिष्ट असा मुहूर्त

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या दिवशी गणेश चतुर्थी येते. पार्थिव गणेश प्रतिष्ठापना आणि पूजन करण्यासाठी विशिष्ट मुहूर्त नाही. कारण, गणपती हाच मुहूर्ताचा अधिपती आहे. प्रात:कालापासून मध्यान्हापर्यंत (दुपारी १ वाजून ५० मिनिटांपर्यंत) कोणत्याही वेळी प्रतिष्ठापना आणि पूजन करता येते. यंदा भद्रा व वैधृति योग असला तरीही नेहमीप्रमाणे ब्राह्म मुहूर्तापासून म्हणजेच पहाटेपासून मध्यान्हापर्यंत घरात मूर्तीची प्रतिष्ठापना करा, असे ओंकार दाते म्हणाले.

असे करा‎ लाडक्या‎‎ गणेशाचे‎ पूजन‎

प्राणप्रतिष्ठापना म्हणजेच मातीच्या, शाडूच्या मूर्तीत जीव ओतणे. पूजनासाठी मूर्ती सजीव बनवणे. मातीच्या गोळ्यापासून मूर्ती बनवलेली असल्याने त्याला पार्थिव म्हणतात. स्वच्छ कपडे घालून खांद्यावर शाल, उपरणे, टॉवेल यांसारखे वस्त्र घ्यावे. चौरंगावर कापड घालून त्यावर पूर्व अगर पश्‍चिमेकडे तोंड करून मूर्ती ठेवावी. शेंदूर, अष्टगंधाचा टिळा लावावा. दूध, दही, गाईचे शुद्ध तूप, मध, साखर या पंचामृतात दुर्वा बुडवून अगदी हळूवार मूर्तीवर शिंपडावे. नवीन वस्त्र आणि जानवे घालून पुष्पहार घालून दूर्वांची जुडी वाहावी.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे