ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

नगरमध्ये लोकसभेला इतिहासाची पुनरावृत्ती ?

अहमदनगर

मविआमध्ये राज्यात अनेक ठिकाणी उमेदवार आणि पक्ष यावरून अजून स्पष्टता पुढे आलेली नाही. अशात नगर दक्षिणेतून लोकसभेसाठी आघाडीचा उमेदवार अद्याप स्पष्ट नाही.

चर्चेत नाव आलेले नेवाशाचे आमदार शंकरराव गडाख यांनी माझे नाव चर्चेत असले तरी पक्षाकडून विचारणा झाल्यानंतर आपण आपली भूमिका स्पष्ट करू, असे सांगत सावध भूमिका घेतली आहे. आमदार शंकरराव गडाख राष्ट्रवादीकडून न लढता 2019 ला अपक्ष म्हणून निवडून आले. त्यांनी तत्पूर्वी क्रांतिकारी शेतकरी पक्षाची स्थापना केली आहे.

शरद पवार यांचे गडाख कुटुंबाशी असलेल्या जवळकीतून राष्ट्रवादीने नेवाशातून उमेदवार दिला नव्हता. तेव्हा भाजपचे बाळासाहेब मुरकुटे यांचा जवळपास 31 हजार मतांनी पराभव करत गडाख निवडून आले. मागील वर्षी एकनाथ शिंदे आणि नुकतेच अजित पवारांनी केलेल्या राजकीय भूकंपात आमदार गडाख यांनी उद्धव ठाकरे शिवसेनेची साथ सोडलेली नाही.गडाखांनी ऑन कॅमेरा पहिल्यांदाच आपली भूमिका स्पष्ट करताना, बदलत्या विविध राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये आपल्या उमेदवारीची चर्चा होत असल्याचे मान्य केले आहे.

नेते आणि जनतेत कार्यकर्ता हा महत्त्वाचा दुआ असतो, असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि पक्ष निरीक्षक आमदार सुनील शिंदे यांनी होणाऱ्या चर्चेवर आपल्याशी चर्चा केल्याचे गडाखांनी मान्य केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे