माणूस परिवार महाराष्ट्र राज्य आदर्श कार्यकर्ता गौरव समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने झेप फाउंडेशन पुणे या फाऊंडेशनला समाज रत्न पुरस्कार प्रदान
अहिल्यानगर प्रतिनिधी - संगीता खिलारी

दिनांक- 09/02/2025 रोजी गणेश सांस्कृतिक हॉल इंग्लिश स्कूल टिळक रोड पुणे येथे समाजातील विविध घटकातील संस्थांना व्यक्तींना आदर्श कार्यकर्ता पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे माजी आमदार उल्हास दादा पवार, आमदार हेमंत रासने, माजी महापौर कमलताई व्यवहारे, स्नेहल पाडळे माजी नगरसेविका, विजय मलेचाय, संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष दुष्यंतराजे सुरेंद्र्दादा जगताप तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य या संस्थेने अनाथ आश्रम, वृद्धाश्रम व पर्यावरण विषयी आजपर्यंत केलेल्या कार्याची, समाज उपयोगी उपक्रम राबविले याचा आढावा घेऊन माणूस परिवार महाराष्ट्र राज्य संस्थेने समाज रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
यावेळी झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष कांताभाऊ राठोड, संस्थापक सचिव शिवाजी मुसळे, पदाधिकारी शहाजी मुसळे, नवनाथ शिंदे, रंजित गायकवाड, डॉ.स्मिता भंगाळे उपस्थित होते ..
तसेच सत्या फाउंडेशनच्या अध्यक्षा गीतांजली जाधव व डॉ.स्मिता भंगाळे मॅडम यांना राजमाता जिजाऊ झुंजार महिला पुरस्काराने गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाच्या वेळी स्टेजवर चिठ्ठ्या टाकून आदर्श कार्यकर्ता निवड करण्यात आले यामध्ये एकता मित्र मंडळ सुधीर धमाले यांच्या मंडळाला आदर्श कार्यकर्ता पुरस्कार मिळाला.कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने पार पडला सर्व संस्थेने व पुरस्कारथीनी माणूस परिवार संस्थेचे आभार मानले.
विविध क्षेत्रातून , मित्र मंडळीनी सामाज रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले.