ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

गिरिजात्मक ग्रूप व शेतकरी मित्र मंडळ यांचे तर्फेभव्य आणि दिव्य असा महिला व युवा यांच्या सन्मानार्थ व व्यावसायिक मेळावा घेण्यात आला.

तळेगाव

गिरिजात्मक ग्रूप व शेतकरी मित्र मंडळ यांचेतर्फे काल दि.22 जानेवारी रोजी गणेश जयंतीचे औचित्य साधून आदरणिय श्री अनूपदादा भेगडे श्री केदारदादा भेगडे यांचे वतीने तळेगाव येथे भव्य आणि दिव्य असा महिला व युवा यांच्या सन्मानार्थ व व्यावसायिक मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात 20 महिला व युवक यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

प्रास्ताविकात श्री अनुपदादा भेगडे यांनी महिला व पुरूष यांना रोजगार मिळावा तसेच शेतकरी बंधू भगिनिंना शेतीपूरक व्यवसायाच्या प्रवाहात आणणे व रोजगार निर्मिती करून देणे हा मेळाव्याचा उद्देश असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमास मा.श्री. संजय (बाळा)भेगडे मा.राच्यमंत्री मावळ विधानसभा आमदार श्री सुनिल आण्णा शेळके, निर्भय महाराष्ट्र पार्टी चे ससंस्थापक अध्यक्ष आदरणिय जितेंद्र भावे सर, पुणे जिल्हा अध्यक्ष आदरणिय प्रशांत घोलप सर महिला संघटक आदरणिय गोरे मॅडम यांनी आवर्जून उपस्थिती लावली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष कृषिअधिकारी आदरणिय श्री सावंत सर यांनी महिलांना करता येणा-या 100 लघुउद्योग व प्रशिक्षण याची सखोल माहिती दिली तर आदरणिय श्री गोळे सर यांनी बॅकेचे व्यवहार व कर्जविषयक मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमास प्रमुख पाहूण्या म्हणून लाभलेल्या कवयित्री व निर्मल चॅरिटेबल ट्रस्ट च्या सचिव

सौ.निशा विसपुते यांना या कार्यक्रमात समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले त्यांनी आपल्या भाषणातून महिला सबलीकरण व सक्षमीकरण याबाबत चर्चात्मक विवेचन केले, तसेच सुरेखाताई भागवत यु ट्यूबर यांनी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचा एक हजार महिला व पुरूष यांनी लाभ घेतला. समारोपाच्या भाषणात श्री केदारदादा भेगडे यांनी सग्ळ्यांचे आभार मानले व श्री गणेशाच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे