सांगली जिल्ह्यातील ४ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करुन खुन करणार्या नराधमाला तात्काळ फाशी द्या
माजलगाव तहसीलदारला सामान्य नागरिकांनी मिळुन दिले निवेदन

सांगलीजिल्ह्यातील जत येथील “करगणी” गावातील ४ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करुन खुन करणार्या आरोपीला १५ दिवसांत दोषारोपपत्र सादर करुन फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवुन आरोपीला तात्काळ फाशी द्या अश्या प्रकारचे निवेदन माजलगाव तहसीलदार यांना सामान्य नागरिकांनी दिले.
सांगली जिल्ह्यातील जत येथील “करगणी” या छोट्याश्या गावी 4 वर्षाच्या चिमुरडीचा अत्याचार करून तिचे तुकडे करून खून करण्यात आला आहे.
वय वर्ष 4 असलेल्या मुलीला काय समज असणार ?? अंगणात खेळत असणाऱ्या पांडुरंग या नराधमाने तिला फूस लावली. मुलीची आई डिलिव्हरी साठी दुसऱ्या गावात गेली होती घरात फक्त तिची आज्जी होती. नातं बाहेर खेळत असेल म्हणून ती आत कामं करत होती. परंतु बाहेर असणाऱ्या नराधम पांडुरंग याने “डाव” साधला. आमिष दाखवत एका पत्र्याच्या खोलीत नेऊन त्याने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करुन तिचा खून केला.दारू पिलेला हा नराधम त्या चिमुकलीला लपवण्यासाठी तेथील एका लोखंडी पेटीचा आधार घेत तिचा मृतदेह त्या पेटीत टाकला.
दुसरीकडे नातं हरवली म्हणून आज्जी सर्वत्र मुलीचा शोध घेत होती. सर्वत्र शोधाशोध सुरु होती. पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. काही अंतरावर हा “क्रूरकर्मा” दारू पिऊन तर्रर्र होता. पोलिसांनी त्यांचा “खाक्या” दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला.नातीचा मृतदेह पाहताच आज्जीने हंबरडा फोडला. 4 वर्षीय मुलीची हत्या झाल्याचे कळताच संपूर्ण जत शहर सुन्न झाले होते.
सर्वांची पायाखालची “वाळू” जणू घसरली होती. दुर्दैवी आज्जीचे रडणे आणि आक्रोश जत च्या माणुसकीच्या अभेद्य भिंती भेदत न्यायाची भीक मागत होत्या. क्रूर पांडुरंग याला फाशीची शिक्षा होण्यासाठी, आता सांगली जिल्हा एकवटला असून “जत बंद” चे नियोजन केले आहे.4 वर्षीय चिमुकली परत येणार नाही पण संवेदना हरवलेल्या या जगात प्राणाची किंमत “शून्य” आहे, याची जाणीव अंगाला “शहारे” देणारी ठरत आहे.
या आरोपीला फाशी होण्यासाठी फास्टट्रॅक कोर्टात केस चालवावी. अरब देशात बलात्कार / खून प्रकरणात आरोपीला दोन दिवसात तात्काळ “फाशीची” शिक्षा देण्यात यावी जत मध्ये घटना घडली असून अशी घटना कोणत्या गावात किंवा जिल्हात घडणार नाही याची काळजी घेऊन आरोपीला तात्काळ केस फास्टट्रॅक कोर्टात चालवुन आरोपीला तात्काळ फाशी देण्यात यावी अश्या प्रकारचे निवेदन माजलगाव तहसीलदार यांना देण्यात आले ह्यावेळी शेख रशिद,शौकत शेख, मुश्ताक कुरैशी,नसीर पठाण, जानुशहा शेख व सामान्य नागरिक उपस्थित होते.