ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगर शहरात चायना मांज्यासह 1 लाख 85 हजाराचा मुद्देमाल जप्त

विक्रीस बंदी असलेला, पक्षी, प्राणी व मानवी जिवीतास इजा करणारा प्लास्टीक नायलॉनचा चायना मांज्याची विक्री करणा-यासाठी घेवुन जाणा-या आरोपीकडुन 1,85,000 रुपये किंमतीचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला आहे. ही कारवाई 1 डिसेंबरला केडगाव येथे करण्यात आली.

याबाबत हकिगत अशी की, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिनांक 01/12/2025 रोजी अहिल्यानगर शहरात पेट्रोलिंग फिरुन प्लास्टीक किंवा नायलॉन चायना मांजा विक्री करणारे इसमांची माहिती काढत असतांना पथकास अहिल्यानगर शहरातील जी.एल.पी. टॉवर लिंकरोड केडगांव या ठिकाणी होंडा कंपनीची विना नंबरची ऍ़क्टीवार एक इसम त्याचे पाठीमागे दोन बॉक्स बांधुन घेवुन जात असतांना दिसला.

तेव्हा पथकाने त्यास थांबवुन पोलीसांची ओळख सांगुन त्याचे नांव गाव विचारले असता, त्याने त्याचे नांव विशाल कुमार दळवी वय – 30 वर्षे रा. आरती रो हाऊसिंग भुषणनगर केडगांव ता. जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. त्यास सदर बॉक्समध्ये काय आहे.

याबाबत विचारपुस करता त्याने सदर बॉक्समध्ये नायलॉन मांजा असुन ते विक्री करण्यासाठी घेवुन जात असल्याचे सांगितले. त्यानंतर पथकाने दोन पंचासमक्ष पंचनामा करुन ताब्यातील इसमाचे कब्जातुन 1,10,000 रुपये किंमतीची 110 नग मोनो काईट, मोनो फायटर व गोल्ड असे नाव असलेले प्लास्टिक नायलॉन मांजा, 75,000 रु कि.ची एक मोटार सायकल असा एकुण 1,85,000 रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन त्याचेविरुध्द पोहेकॉ सुनिल विनायक पवार नेम – स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचे फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस ठाणे गु.र.नं. 1093/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223, 125 सह पर्यावरण संरक्षण अधिनियम क. 5, 15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन करीत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे