ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

कल्पनेला पंख देणारी लोक म्हणजे पर्यटन व्यावसायिक – मकरंद टिल्लू

पुणे

भारतीय पर्यटन सहकारी संस्था आयोजित पुणे ट्रेवल फेस्टिवल चे उद्घाटन आज मोठ्या उस्ताहात पार पडले. कार्यक्रमाचे उद्घाटन पर्यटन संचनालयाच्या उपसंचालिका सौ शामा पवार यांच्या हस्ते झाले तर प्रमुख पाहुणे म्हणून हास्य योगा प्रशिक्षक श्री मकरंद टिल्लू आणि आय आरसीटीसी चे श्री सोना सर उपस्थित होते.

आपटे रोड वरील सेंट्रल पार्क हॉटेल येथे हे प्रदर्शन सकाळी दहा ते संध्याकाळी आठ पर्यंत येत्या रविवार पर्यंत सर्वासाठी खुले आहे.

दरम्यान केंद्रीय पर्यटन राज्य मंत्री श्री श्रीपाद नाईक यांचा शुभेच्छा संदेश दॄकश्राव्य माध्यमातून दाखविण्यात आला.

कल्पनेला पंख देणारी लोक म्हणजे पर्यटन व्यावसायिक आहेत आणि देशाच्या अर्थ व्यवस्थेत मोलाचा सहभाग पर्यटन व्यावसायिकांचा आहे असे गौरव उदगार श्री मकरंद टिल्लू यांनी काढले.

या प्रसंगी जगाचे टेन्शन विसरून पर्यटकाना स्वतः साठी टूरिझम करा असा मोलाचा सल्ला जमलेल्या पर्यटकांना श्री सोना साहेबानी दिला. तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष सौ शामा पवार यांनी शासना कडून राबविल्या जाणाऱ्या पर्यटनातील विविध योजनाची माहिती दिली आणि सर्व योजनांचा व्यवसायीकानी योग्य लाभ घ्यावा असे आवाहन केले.

तत्पूर्वी संस्थेचे संचालक श्री संतोष माने यांनी प्रास्ताविक मांडले तर सौ पूजा कुलकर्णी यांनी सूत्र संचलन केले

हे प्रदर्शन रविवार पर्यंत सुरु राहणार आहे. या प्रदर्शनात ४५ पेक्षा जास्त पर्यटन व्यवसाईकांनी आपले स्टॉल लावले आहेत, एकाच ठिकाणी जगभरातील पर्यटनाचे अनेक पर्याय येथे उपलब्ध आहेत. रोज अनेक लकी ड्रॉ काढले जात आहेत.

या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक गिरीकंद ट्रव्हेल्स तर सह प्रायोजक जॉय एंड क्रू आणि थॉमस कुक आहेत

या प्रदर्शनाचा पुणेकर पर्यटकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अधक्ष्य श्री प्रविण घोरपडे आणि सचिव सुरेंद्र कुलकर्णी यांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे