ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

दिलखुलास गप्पाब्रेकिंगमहाराष्ट्र

अहमदनगर मधील SJK ब्युटी ॲकॅडमी आता नवीन जागेत स्थलांतर..

अहमदनगर प्रतिनिधी

SJK ब्युटी ॲकॅडमी च्या सारिका उपाध्ये,सुमन श्रीगादी, जयश्री काकडे, कविता भारताल, कल्पना नाकाडे यांनी अहमदनगर मध्ये SJK ब्युटी ॲकॅडमी ची स्थापना केली. आता या ॲकॅडमी ला एक वर्ष पूर्ण झाले आहे.

या पाच जणींना स्वतः ह्या व्यवसाया मध्ये साधारण 10 ते 15 वर्षाचा अनुभव आहे. या पाच ही जणींना उच्च शिक्षण घेत असताना खूप अडचणींना सामोरे जावे लागले.

अहमदनगर मध्ये हे उच्च शिक्षण मिळत नसल्याने पुणे, मुंबई ,नाशिक ला जाऊन ट्रेनिंग घेतले, ह्या पाच ही जणी पुणे, मुंबई, नाशिक येथे अप डाऊन करायच्या. मुलांची शाळा, घरातील कामे सर्व काही सांभाळून करून ब्युटी ॲकॅडमी चे शिक्षण पुर्ण केले.

तेव्हा या पाच ही जणींच्या लक्षात आले की आपण जे शिक्षण पुणे, मुंबई,नाशिक येथे जाऊन घेतले ते अहमदनगर मध्ये कुठे च दिले जात नाही.. आपण जर हेच शिक्षण अहमदनगर च्या मुलींना मिळावे त्यांना पुणे, मुंबई, नाशिक ला जाण्याची गरज नसावी.हा एकच ध्येय त्यांनी समोर ठेवून ह्या SJK अकॅडमी ची स्थापना केली.

सारिका ,सुमन ,जयश्री ,कविता , कल्पना यांनी असे ठरवले की हे शिक्षण घेतांना आम्हाला जेवढा खर्च आला त्यापेक्षा कमी खर्चात मुलींना शिक्षण मिळावे. या पाच ही जनी आपापले व्ययसाय सांभाळून अकॅडमी पण चालवत आहेत.

सुरवातीला फक्त ८ मुली घेऊन अकॅडमी सुरू झाली. अकॅडमी मध्ये बेसिक, ॲडव्हान्स, प्रोफेशनल ब्युटी कोर्स घेतले जातात.

त्याचप्रमाणे डिप्लोमा, डिग्री, इंटरनॅशनल कोर्स, हेअर आणि त्या सोबत मेकअप,पर्सनल गृमिंग चे पण क्लासेस घेतले जातात.

आतापर्यंत बऱ्याच मुलींनी अकॅडमी मध्ये येऊन शिक्षण घेऊन स्वतच्या पायावर उभ्या आहेत. महिला सक्षमीकणा साठी उचलेले हे पाऊल अहमदनगर मध्ये ब्युटी क्षेत्रात नक्कीच काहीतरी बदल घडवून आणतील .

अहमदनगर जिल्ह्यातील बाहेरगावाहून राहुरी,जामखेड सुपा येथील मुली पण आपल्याकडे शिक्षण घेत आहेत.

आनंदाची गोष्ट अशी वाटते की तालुका ठिकाणाहून पण चांगला प्रतिसाद मिळाला आहे. इंटरनॅशनल (CAT )ह्या परिक्षेसाठी बाली (इंडोनेशिया) ह्या साठी सारिका , सुमन ,जयश्री ,कविता , कल्पना या पाच जणींची निवड झाली होती.

अकॅडमी मध्ये असे इंटरनॅशनल कोर्सेस उपलब्ध आहेत. या पाच जणींचा कामाचा आढावा घेऊन नगरमध्ये राजमाता जिजाऊ पुरस्काराने यांना सन्मानित करण्यात आले. ही त्यांच्यासाठी खूप आनंदाची बाब आहे.‌

ब्युटी क्षेत्रात करियर करायचे निवडले तर आपण अगदी त्यात पी जी पण करून शकतो. हे क्षेत्र आता एक ब्युटी पॅरामेडिकल फील्ड म्हणून ओळखले जाते आहे.

म्हणून या SJK च्या पाच ही जणींना वाटते मुली व महिला नी स्वतचं करियर म्हणून हे क्षेत्र नक्कीच निवडावे .

या साठी अधिक माहिती साठी SJK अकॅडमी ला एकदातरी नक्की भेट द्यावी.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे