
आर्थिक बेशिस्तीची दखल घेऊन भारतीय रिझर्व्ह बँकेने अभ्युदय सहकारी बँकेवर कारवाई केली. अभ्युदय सहकारी बँकेचे व्यवस्थापन एक वर्षासाठी बरखास्त करून रिझर्व्ह बँकेने प्रशासकाची नियुक्ती केली आहे.
प्रशासक नियुक्त केला तरी अभ्युदय सहकारी बँकेचा कारभार नियमांनुसार सुरळीत सुरू राहणार आहे. स्टेट बँकेचे माजी मुख्य महाव्यवस्थापक सत्य प्रकाश पाठक यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.