महाराष्ट्रात थंडीचा कडाकाही वाढणार आणि सोबतीला पाऊसही पडणार..

जानेवारीला सुरुवात झाल्याबरोबर पुन्हा एकदा राज्यात थंडी परतली. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना दिलासा मिळाला. पण राज्यात एकीकडे गारठा वाढू लागला असतानाचं भारतीय हवामान विभागाकडून आज राज्यातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने अगदीच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा नवीन अंदाज जारी केला असून यामुळे या भागातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल पाहायला मिळाला. डिसेंबर मध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये ढगाळ हवामान होते आणि काही ठिकाणी पाऊसही झाला. गेल्या महिन्यात राज्यात हलका ते मध्यम पाऊस झाल्यानंतर राज्यातील कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली आणि यामुळे थंडीचा जोर बऱ्यापैकी कमी झाला.
पण जानेवारीला सुरुवात झाल्याबरोबर पुन्हा एकदा राज्यात थंडी परतली. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना दिलासा मिळाला. पण राज्यात एकीकडे गारठा वाढू लागला असतानाचं भारतीय हवामान विभागाकडून आज राज्यातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने अगदीच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा नवीन अंदाज जारी केला असून यामुळे या भागातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. खरेतर गेल्या महिन्यात हवामानात झालेल्या सततच्या बदलांमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले.
रब्बी हंगामातील गहू, भरभरा, कांदा तसेच फळबाग पिकांना ढगाळ हवामान आणि पावसाळी वातावरण फारच प्रतिकूल राहिले आणि यामुळे पिकांवर विविध रोगांचे आणि किटकांचे सावट पाहायला मिळतयं. पण जानेवारीच्या सुरुवातीपासून हे वातावरण निवळले.
त्यामुळे शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला. मात्र आता पुन्हा एकदा वातावरण खराब होणार असे दिसते. कारण की आज भारतीय हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानाची आणि अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
मागील काही दिवसांपासून राज्यातील कमाल आणि किमान तापमानात सतत चढउतार सुरु होता, दुसरीकडे मागील दोन दिवसांपासून राज्यात थंडीलाही सुरूवात झाली होती. अनेक ठिकाणी थंड वारे वाहत होते. पण आता पुढील काही तास राज्यात तुरळक ठिकाणी अवकाळीचा इशारा देण्यात आलाय.
अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे पुन्हा मोठं नुकसान होणार अशी भिती आहे. राज्यातील मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, धुले आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये हलक्या ते मध्य स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.