ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

खा.सुजय विखे पाटील स्पष्टचं म्हणाले की अहमदनगर मध्ये ‘याच’ मुद्यावर मतदान मागणार!

अहमदनगर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एक खासदार म्हणून जी काही विकासकामे मी आजवर केली आहेत, त्या विकासकामांच्या जोरावरच मी मतदान मागणार असे मत आज खा. विखे पाटील यांनी मांडले. पोखर्डी व कापुरवाडी ता. नगर येथील विविध विकासकामांच्या भूमिपूजन समारंभाप्रसंगी ते बोलत होते.

खासदार सुजय विखे पाटील व जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला.

जलसंधारण विभाग अंतर्गत पोखर्डी येथे वन जमीन अंतर्गत कोल्हापूर बंधारा बांधणे व पोकळी ते गावठाण अंतर्गत कोल्हापूर बंधारा बांधणे – अंदाजे रक्कम २.३४ कोटी, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत वारुळवाडी पोखर्डी-ढवळे वस्ती रस्ता डांबरीकरण करणे – अंदाजे रक्कम ३.१९ कोटी, २५१५ ग्रामविकास निधी अंतर्गत पोखर्डी येथे स्मशानभूमी शेड व सुशोभीकरण करणे – अंदाजे रक्कम १० लक्ष, ३०५४ योजनेअंतर्गत शेंडी-पोखर्डी गावाला जोडणाऱ्या रस्त्यावर सिडी वर्क बांधणे – अंदाजे रक्कम ३० लक्ष तसेच पंधरा वित्त आयोग ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या विकास कामांचे भूमीपूजन यावेळी करण्यात आले.

या कार्यक्रमादरम्यान खासदार विखे म्हणाले की, विकास ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. या सगळ्या प्रवासात दीड वर्षाच्या राज्य सरकारच्या कालावधीमध्ये कर्डिले साहेबांच्या यांच्या नेतृत्वात नगर तालुक्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी देऊन विविध कामांचे भूमिपूजन केले आहे आणि विशेष म्हणजे ही विकासकामे केवळ सहा महिन्यात पूर्ण केली आहेत. इतक्या गतीने आणि कुठलेही दुर्लक्ष न करता समाजहित जोपासत ही विकासात्मक वाटचाल सुरू आहे. त्यामुळे मी जी काही विकासकामे माझ्या कारकीर्दीत केली आहेत ती जनतेसमोर मंडणार आणि मग या जिल्ह्यातील गोर गरीब जनताच ठरवेल की पुढील खासदार कोणअसणार.. हे चार-पाच पुढारी ठरवू शकत नाही असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

याप्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले व अक्षय कर्डिले यांची देखील समायोचित भाषणे झाली. यावेळी दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले, भाऊसाहेब बोठे, रबाजी सुळ, तालुकाध्यक्ष दिपक कार्ले, मधुकर मगर, सुधीर भापकर, मंजाबापू आव्हाड, संजय गिरवले, दत्ता तापकिरे, भाऊसाहेब ठोंबे, धर्मनाथ आव्हाड, जगन्नाथ मगर, भगवान आढाव तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे