ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

धनगर आरक्षणासाठी नगर- संभाजीनगर महामार्ग राेखला, जुन्नरला आदिवासी समाजाचा विराेध

शेकडो समाजबांधव रस्त्यावर उतरले. यावेळी आंदाेलकांनी आरक्षणाची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली.

धनगर समाजाने आज (शनिवार) धनगर आरक्षणाची मागणी करीत नेवासा येथे महामार्गावर रास्ता राेकाे आंदाेलन छेडले. दरम्यान दूसरीकडे आमच्या ताटातला घास कुणालाही देणार नाही असं म्हणत आदिवासी बांधवांनी नगर कल्याण महामार्गावर बसुन आंदोलन छेडले आहे.

धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे अशी मागणी नगर जिल्ह्यातून करण्यात आली. सकल धनगर समाजाच्या वतीने अहमदनगर – संभाजीनगर महामार्गावर रास्ता रोको आंदाेलन करण्यात आले. या आंदाेलनात  नेवासा तालुक्यातील शेकडो समाजबांधव रस्त्यावर उतरले. यावेळी आंदाेलकांनी आरक्षणाची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली.

धनगर समाजाला अनुसुचित जातीत समाविष्ट करु नका

दरम्यान धनगर समाजाला आरक्षण देत असताना धनगर समाजाला अनुसुचित जातीमध्ये समाविष्ट करु नये यासाठी जुन्नर  तालुक्यात आदिवासी समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

यावेळी आदिवासींच्या योजना सुध्दा धनगर समाजाला देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. धनगर समाजाला आदिवासींच्या योजना द्या किंवा त्यांच्यासाठी नवीन आणखी काही योजना आणा आम्हाला काही हरकत नाही मात्र यासाठी आदिवासींच्या विभागाचा एकही पैसा खर्च होता कामा नये अशी मागणी यावेळी करण्यात आली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे