बुध्दगया येथील मागण्यासंदर्भात निवेदनाव्दारे राष्ट्रपतीकडे मागणी – तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई
अहिल्यानगर प्रतिनिधी - संगीता खिलारी

मेहकर येथे तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांच्या नेतृत्वाखाली मा. मडके साहेब तहसीलदार मेहकर यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये बुद्धगया येथील महाबोधी महावीर मुक्त करण्याची न्याय मागणी मान्य करण्यात यावी या अशी विनंती करण्यात आली. मागणीसाठी बौद्ध भिक्कू तेरा दिवसापासून उपोषणाला बसले आहेत कित्येक भिक्कूची तब्येत चिंताजनक आहे. तरी शासन प्रशासन काही कार्यवाही करत नाही. बुद्धगया येथील महाबोधी महाविवार १९४९ चा व्यवस्थापन अॅक्ट तात्काळ दुरुस्ती करून महाबोधी महावीराचे संपूर्ण व्यवस्थापन हे बौद्धाचे हाती देण्यात यावे. बुद्धगया महाबोधी महाविवार येथे सुरू असलेल्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनातील सर्व मागण्या त्वरित मंजूर कराव्यात व देशातील सर्व बौद्ध बांधवांच्या भावनेचचा विचार व आदर करून १९४९0 च्या व्यवस्थापन अॅक्ट दुरुस्ती करावी ही तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने मेहकर तहसीलदार साहेब यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपती भारत सरकार यांना निवेदन सादर करून मागणी करण्यात आली आहे.
यावेळी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई, रवि मिस्किन, राधेशाम खरात,प्रकाश शेजुळ, अनिल खंडारे,रामेश्वर रहाटे, शामराव शेजुळ, जगदिश एखंडे, कुणाल माने, अख्तर कुरेशी, विशाल लोहार, महिला आघाडी कांचन मोरे, लक्ष्मी कस्तुरे, प्रतिभा गवई, उषा सगट, आम्रपाली गवई, निता पैठणे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते