
आज भाऊबीजेच्या दिवशी बुधवार १५ नोव्हेंबर रोजी बेस्ट प्रशासन १४५ जादा बसगाड्या सोडणार आहे. मुंबई शहर, पूर्व- पश्चिम उपनगरे, पश्चिम द्रुतगती महामार्ग, मिरा रोड, भाईंदर, मॅरेथॉन चौक (ठाणे), कोपरी (ठाणे), कॅडबरी जंक्शन (ठाणे) तसेच वाशी, नवी मुंबई, कोपरखैराणे, नेरुळ, ऐरोली, घणसोली स्थानक, सीबीडी बेलापूर आदी ठिकाणी जाणाऱ्या वेगवेगळ्या मार्गांवर बेस्ट उपक्रमाच्या वतीने १४५ अतिरिक्त बसगाड्या सोडल्या जातील.
प्रवासी संख्येत वाढ होताना दिसल्यास बसच्या संख्येत आणखी वाढ करण्याचे नियोजन असल्याचेही बेस्ट उपक्रमाने जाहीर केले आहे.