पद्मशाली युवाशक्ती ट्रस्टच्या वतीने वंचित वृध्द आणि दिव्यांग व्यक्तींना फराळ वाटप
अहमदनगर

हिंदू संस्कृतीतील सर्वात मोठा सण दिवाळी निमित्त नवीन कपडे, नवीन वस्तू खरेदी, नवीन गाडी खरेदी अशी लगबग सगळ्याच घरांमधून पाहायला मिळत असते. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांची दिवाळी च्या सणासाठी मोठी तयारी करताना दिसतात, परंतु काही घर अशी पण असतात त्यांना एक वेळचे जेवण मिळणे देखील कठीण असते ज्यांना घरातील कोणी नवीन वस्तू आणणारे नसतात, दिवाळीच्या शुभेच्छा देणारे देखील कोणी नसतात त्यांना फराळाचे वाटप करून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पद्मशाली युवाशक्ती ट्रस्ट चे युवक सकाळी ९ वाजता त्यांच्या घरी जाऊन फराळ पोहोच करतात.
मागील ७ वर्षा पासून फराळ पोहोच करण्याचे कार्य ट्रस्ट कडून केले जाते असे पद्मशाली युवाशक्तीचे श्रीनिवास इप्पलपेल्ली यांनी सांगितले.
दरवर्षी न चुकता पद्मशाली युवाशक्ती ट्रस्ट कडून दिवाळी च्या दिवशी वंचीत वृद्धांना फराळ दिल्यामुळे आम्हाला आमच्या माहेरहून दिवाळी च्या शुभेच्छा घरापर्यंत पोहोच झाल्यात असे वंचित वृध्द महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात.
या कार्यासाठी चंद्रकांत म्याना आणि संजय चिप्पा यांनी आर्थिक सहाय्य केले आहे.
या वेळी पद्मशाली युवाशक्ती ट्रस्ट चे योगेश म्याकल, सुमित इप्पलपेल्ली, अजय म्याना, दिपक गुंडू, श्रीनिवास इप्पलपेल्ली, योगेश ताटी, सागर बोगा, सागर आरकल, नरेश कोटा, सागर मेहसूनी, विद्या एक्कलदेवी, वेदांत म्याना उपस्थित होते.