ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

नगर शहरात जमीन व्यवहारात डॉक्टरची फसवणूक, माजी नगरसेवक स्वप्नील रोहीदास शिंदे व महेश नारायण कुर्‍हे अटकेत

अहिल्यानगर

अहिल्यानगर मधील जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात सावेडी येथील डॉक्टरची तब्बल 14 कोटी 66 लाख रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी माजी नगरसेवक स्वप्नील रोहीदास शिंदे व महेश नारायण कुर्‍हे यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.

त्यांना मंगळवारी (23 जून) न्यायालयासमोर हजर केले असता सहा दिवसांची (6 जुलैपर्यंत) पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, 15 दिवसांपूर्वीच या गुन्ह्यातील मुख्य संशयित अमोल बबन जाधव (वय 40, रा. मोरगव्हाण, ता. नेवासा) याला अटक केली होती. आतापर्यंत तिघांना या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

स्वप्नील शिंदे व महेश कुर्‍हे हे दोघे खून, मोक्का कलमान्वये दाखल गुन्ह्यात अटकेत होते. त्यांना नाशिक कारागृहातून वर्ग करून फसवणूकीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

डॉ. अनिल सुर्यभान आठरे (वय 73, रा. झोपडी कॅन्टींग, सावेडी) असे फसवणूक झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. त्यांनी 8 नोव्हेंबर 2025 रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून 30 जणांच्या टोळीविरोधात कटकारस्थान रचून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा गुन्हा तपासकामी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

या गुन्ह्यातील मुख्य संशयित अमोल जाधव हा गुन्हा दाखल झाल्यापासून पसार होता. त्याला सुरूवातीला अटक करण्यात आली. यानंतर स्वप्नील शिंदे व महेश कुर्‍हे हे न्यायालयीन कोठडीत असल्याने त्यांना वर्ग करून घेण्यात आले. त्यांना मंगळवारी अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

न्यायालयाने दोघांना 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे