
सेंट विवेकानंद इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाची उत्साहात सुरुवात झाली आहे. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे शाळेत शिक्षकांनी स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या. शिक्षकांनी स्वागतगीत सादर केले.
शिक्षकांनी आपापले वर्ग सजावट करून वातावरण प्रसन्नमय केले. उपप्राचार्या कांचन पापडेजा यांनी सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांची ओळख करून दिली. शाळेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांच्याही चेहऱ्यावर आनंद फुलला होता. दीर्घ सुटीनंतर मित्र मैत्रिणी भेटल्याने गप्पाटप्पा रंगल्या होत्या.
स्वागत करताना प्राचार्या गीता तांबे म्हणाल्या, सर्व विद्यार्थी नवीन शैक्षणिक वर्षात आणखी चांगली कामगिरी करण्यास सज्ज झाले आहेत. शाळेचे आवार विद्यार्थ्यांनी पुन्हा गजबजल्याने वातावरण आनंदी झाले आहे. यावर्षी सुध्दा शाळेच्या परंपरेनुसार विद्यार्थ्यांना चांगले मार्गदर्शन करून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व शिक्षक एकत्रित प्रयत्न करतील.
संस्थेचे अध्यक्ष रामचंद मेंघानी, उपाध्यक्ष रूपचंद मोटवानी, सेक्रेटरी गोपाल भागवानी, खजिनदार दामोधर मखिजा, ट्रस्टी सुरेश हिरानंदानी, महेश मध्यान, राजकुमार गुरनानी, हरेश मध्यान यांनीही सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूचिता सारडा यांनी केले.