ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

सिएट कंपनी टायर परस्पर विक्री करणारा चालक जेरबंद

अहिल्यानगर प्रतिनिधी - संगीता खिलारी

तब्बल दोन लाख 52 हजार रुपयांचे सिएट कंपनीचे टायर परस्पर विक्री करणाऱ्या चालकाला पकडून मुद्देमाल व्यक्त करण्याची कारवाई अहिल्यानगर क्राईम ब्रँच टीमने ही कामगिरी केली आहे.

इरशाद निसार अहमद (वय 55 राहणार रामपूर कुमियान,तलाल पट्टी, प्रतापगड उत्तर प्रदेश. अब्दुल कूरियम अब्दुल वहाब शहा वय 24 राहणार जिम मैदान जवळ चाळीसगाव रोड धुळे ) असे पकडण्यात आलेल्या चे नाव आहे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अहिल्यानगर क्राईम ब्रँच चे पोनि दिनेश आहेर यांच्या सूचनेनुसार क्राईम ब्रँचचे पोसई तुषार धाकराव, पो हम अ` बापूसाहेब फोलाने. मनोहर गोसावी. फुरकान शेख. मेघराज कोल्हे. प्रशांत राठोड. सागर ससाने. महादेव भांड. आदींच्या टीमने ही कारवाई केली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी आहे की. दिनांक 27 डिसेंबर 2024 रोजी परकोक्ट मारी टीम एजन्सी तामिळनाडू या कंपनीच्या मार्फत कंटेनर ( क्र पी बी 13. ए डब्ल्यू 50 64 ) मधून सी एट कंपनीचे टायर हलोल, गुजरात येथून होसुर तामिळनाडू येथे मागविलेले होते. कंटेनर चालकाने सिएट कंपनीचे टायरची परस्पर विक्री करून विल्हेवाट लावली व रिकामा कंटेनर जातेगाव शिवार,ता पारनेर येथे उभे केले मोहमंद मुस्तफा (रा. मेन रोड, श्रीवाचूर, पेरंबलोर, तामिळनाडू) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुपा पोलीस ठाण्यात गु. र. नं. 06/2025 बीएनएस कलम 316(4) प्रमाणे विश्वासघाताचा गुन्हा दाखल आहे.

या दाखल गुन्ह्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार क्राइम ब्रँचचे पोनि दिनेश आहेर यांनी नियुक्त तपासी टीमने गुन्ह्याच्या तपासाचे तांत्रिक विश्लेषणाचे आधारे संशयीत आरोपी इरशाद निशार अहमद (रा. रामपूर कुमियान, पो. तलालपट्टी, प्रतापगड, उत्तर प्रदेश) असे असल्याचे सांगितले. ताब्यातील आरोपीकडे गुन्ह्याबद्दल विचारपूस केली. असता त्याने ट्रक मधून सिएट कंपनीचे टायर तामिळनाडू येथे घेऊन जात असताना त्याचा साथीदार फरारी जावेद उर्फ जोसेफ शेख (रा. राणीगंज,जि. प्रतापगड, उत्तर प्रदेश) व जावेदचा मित्र अन्सार पूर्ण नाव माहित नाही अशांनी अब्दुल कयूम अब्दुल वहाब शहा (रा. जीन मैदान जवळ, चाळीसगाव रोड, धुळे) यास 82 टायर्स विकले. तसेच ट्रक मधील उर्वरित टायर्स हे अहिल्या नगर जिल्ह्यामध्ये विक्री केले. त्याबाबत मला सांगता येणार नसल्याबाबत ची माहिती सांगितली. क्रा

इम ब्रँच टीमने अब्दुल कय्युम अब्दुल वहाब शहा वय 24 रा.जिन मैदान जवळ चाळीसगाव रोड, धुळे याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले.

त्याच्याकडे गुन्ह्यातील मुद्देमालाची विचारपूस केली असता रोडने जाणाऱ्या ट्रकला वेळोवेळी टायर विकले व उर्वरित टायर्स हे अनिस हयात खान रा. रमाबाई आंबेडकर नगर, गल्ली नं 9 , देवपूर,धुळे याच्या दुकानाच्या मोकळ्या जागेत ठेवल्याबाबत माहिती दिली. क्राईम ब्रँच टीमने पंचासमक्ष अनिस हयात खान वय 39, रा. रमाबाई, आंबेडकर,गल्ली नं 9, देवपूर, धुळे याने त्याचे दुकानासमोर ठेवलेले 2 लाख 52 हजार किमतीचे सिएट कंपनीचे 12 टायर हजर केल्याने तपास कामी जप्त करण्यात आले आहेत .

ताब्यातील आरोपी इरशाद निशार अहमद वय 55, रा. रामपूर कुमियान, पो. तलाल पट्टी, प्रतापगड, उत्तर प्रदेश व अब्दुल कय्युम अब्दुल वहाब शहा वय 24 रा. जीन मैदान जवळ, चाळीसगाव रोड, धुळे यांना ताब्यात घेऊन जप्त करण्यात आलेल्या मुद्देमाला सह सुपा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. या गुन्ह्याचा पुढील तपास सुपा पोलीस करीत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे