भाजपाची पाचवी यादी जाहीर, महाराष्ट्रातली आणखी तीन नावं जाहीर,वरुण गांधींचा पत्ता

महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. यापैकी २० जणांची यादी भाजपाने आधीच जाहीर केली आहे. आता भाजपाने आणखी तीन उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांना मिळणाऱ्या जागा या बाकी २५ जागांमधून असतील यात शंका नाही. तर भाजपाने या निवडणुकीतून वरुण गांधींचा पत्ता कापला आहे.
भंडारा गोंदियातून सुनील बाबूराव मेंढे भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवतील. तर गडचिरोलीतून अशोक महादेव नेते भाजपाचे उमेदवार आहेत. सोलापूरमध्ये म्हणजेच प्रणिती शिंदेंच्या समोर भाजपाच्या राम सातपुतेंचं आव्हान असणार आहे. त्यामुळे ही लढतही रंगतदार होईल असं दिसून येतं आहे.
उत्तर प्रदेशातल्या सहारनपूरहून राघव लखनपाल, मुरादाबादमधून सर्वेश सिंह, मेरठमधून अरुण गोविल, गाजियाबादमधून अतुल गर्ग, अलीगढमधून सतीश गौतम, हाथरसमधून अनुप वाल्मिकी, बदायूंहून दुर्विजय सिंह शाक्य बरेलीहून छत्रपाल सिंह गंगवार, सुल्तानपूरमधून मनेका गांधी, पीलभीतमधून जितिन प्रसाद, कानपूरमधून रमेश अवस्थी, बाराबंकीतून राजरानी रावत, बहराईचमधून अरविंद गोंड यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.
मनेका गांधींना उमेदवारी दिली गेली आहे मात्र वरुण गांधींना तिकिट देण्यात आलेलं नाही.