ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगर जिल्ह्यातील मंदीरामध्ये चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

मंदीर चोरीचे एकुण 15 गुन्हे उघडकीस आणुन 4,83,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगरची मोठी कारवाई

प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक 04/10/2025 रोजी ते 05/10/2025 रोजीचे दरम्यान रोजी रात्री श्री. शनिमारुती मंदीर, करोडी ता. पाथर्डी या ठिकाणी कोणीतरी अज्ञात चोरट्याने मंदीरातील दानपेटीतील एकुण 3,50,000/- रुपये रोख रक्कम चोरुन नेले आहे.

याबाबत पाथर्डी पोलीस स्टेशन गु. र. नं. 1138/2025 बी.एन.एस. 2023 चे कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मंदीरातील दानपेटी, देवी, देवतांचे दागिने चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली होती. मंदीरामध्ये झालेल्या चोरीच्या घटनांमुळे भाविक व ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण तयार झालेले होते. मा. श्री. सोमनाथ घार्गे साहेब, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यातील मंदीरामध्ये झालेल्या घरफोडी चोरीच्या घटनांचा आढावा घेवुन गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेश दिलेले आहेत.

नमुद आदेशान्वये किरणकुमार कबाडी पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी मंदीर चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेकरीता स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/हरिष भोये, पोलीस अंमलदार सुरेश माळी, गणेश लोंढे, विष्णु भागवत, फुरकान शेख, राहुल डोके, आकाश काळे, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ, रोहित येमुल, प्रशांत राठोड, महादेव भांड महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत यांचे पथक तयार करुन सदर पथकास अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मंदीर चोरीचे घटनांची माहिती घेवुन अशा प्रकारे गुन्हे करणारे आरोपींची माहिती संकलित करुन गुन्हे उघडकीस आणणेकरीता पथकास मार्गदर्शन व सुचना देवुन सदरचे पथक रवाना करण्यात आले होते.

वर नमुद पथकाने अहिल्यानगर जिल्ह्यातील मंदीर चोरीचे गुन्ह्यांचा आढावा घेवुन प्रत्येक गुन्हा ठिकाणी भेटी देवुन व्यवसायीक कौशल्याचे आधारे माहिती संकलित केली. सदर माहितीचे आधारे गुन्हृयातील आरोपींची माहिती काढत असतांना दिनांक 10/10/2025 रोजी गोपनिय माहितीनुसार सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी नामे राहुल किशोर भालेराव रा. वडाळा महादेव, ता. श्रीरामपुर जि. अहिल्यानगर व त्याचे इतर साथीदारांनी केला असल्याची माहिती प्राप्त झाली. प्राप्त माहितीनुसार 1) राहुल किशोर भालेराव रा. वडाळा महादेव, ता. श्रीरामपुर जि. अहिल्यानगर, 2) रामेश्वर ज्ञानदेव धनेश्वर रा. इंदिरानगर, भोकर ता. श्रीरामपुर जि. अहिल्यानगर, 3) एकनाथ नारायण माळी रा. ममदापुर ता. राहाता हल्ली रा. बिरोबा बन, शेतकरी हॉटेल मागे, शिर्डी, 4) शत्रुघ्न मुरलीधर मोरे रा. टाकळी मानुर, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर हे वेगवेगळ्या ठिकाणी मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले असुन त्यांचेकडे विचारपुस करता त्यांनी त्यांचे साथीदार 5) राहुल भाऊसाहेब माळी रा. बिरोबा बन, शेतकरी हॉटेल मागे, काच मंदीर रोड, भिल वस्ती, शिर्डी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर (फरार), 6) पांडु उर्फ दत्तु बाबासाहेब मोरे, रा. भोकर, ता. श्रीरामपुर (फरार) 7) पांडु उर्फ दत्तु बाबासाहेब मोरे याचा एक अनोळखी मित्र त्याचे नाव गाव माहिती नाही अशांनी मिळुन मागील 7 ते 8 महिण्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मंदीरामध्ये घरफोडी चोरी केल्याची कबुली दिली आहे.

ताब्यातील आरोपींचे कब्जातुन 4,83,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल त्यामध्ये रोख रक्कम, सोन्याचे – चांदीचे दागिने, गुन्ह्याचे वेळीवापरलेल्या दोन मोटारसायकल, मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ताब्यातील आरोपींकडुन अहिल्यानगर व कोल्हापुर जिल्ह्यातील खालीलप्रमाणे 15 मंदीर चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे