ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

पुणे येथील चिंतामणी प्रभात शाखेतर्फे अनामप्रेम येथे सर्व ज्येष्ठ स्वयं सेवकांनी भेट दिली.

पुणे

 बुधवार दिनांक ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता चिंतामणी प्रभात शाखे तर्फे अनामप्रेम (दिव्यांग , मुकबधीर, अंध व अपंग ) संस्था, सुखसागरनगर भाग -१ , कात्रज ,पुणे येथे सर्व ज्येष्ठ स्वयं सेवकांनी भेट दिली.

प्रत्येकांनी आपला परिचय करून दिला.वसतिगृह विद्यार्थ्यांनी आज संत श्री ज्ञानेश्वर महाराजांचे जन्म दिवस व गोकुळ अष्टमीचे औचित्य साधून पेटी व तबला वाजवून पसायदान सादर केले. तसेच श्री.सातभाई यांनी सामुदायिक पद्य सादर केले.

सर्वांनी विद्यार्थांना राख्या बांधल्या. अंबा बर्फी  विद्यार्थांना वाटप केले. तसेच गहू दिले. सर्व श्री. रामदिन, सातभाई, वाघमारे, वाघ, जिंदम, लगड व कुंदारम इत्यादी सदर कार्यक्रमास उपस्थित होते.

काकाभाऊ या अंध विद्यार्त्याने ऋणी असल्याचे समाधान व्यक्त केले व सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाल्याचे जाहीर केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे