ब्रेकिंग
म्हाडाला मुंबई मंडळाच्या घरांच्या सोडतीसाठी मुहूर्त मिळेना ? अर्जदार संतप्त

म्हाडाने मुंबई मंडळाच्या घरांच्या सोडतीची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. सोडत जाहीर होत नसल्याने मुंबई मंडळाच्या लॉटरीसाठी अर्ज केलेले अर्जदार संतप्त आहेत. अर्जदारांकडून म्हाडाला एकूण ५१९ कोटी रुपयांची अनामत रक्कम मिळाली आहे. म्हाडाने यापूर्वी 18 जुलै रोजी सोडत काढण्याची घोषणा केली होती, परंतु अर्जाची अंतिम मुदत वाढवून सोडत पुढे ढकलली.
अजूनही म्हाडाने नवीन सोडतीची तारीख जाहीर केलेली नाही. त्यामुळे अर्ज केलेले एक लाखाहून अधिक अर्जदार सोडतीची तारीख जाहीर होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत..