गणेशोत्सव काळात सोशल मीडियावर सायबर क्राईमची करडी नजर
अहमदनगर - अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर यांची माहिती

यंदाचा गणेशोत्सवमध्ये सोशल मीडियावर सायबर क्राईमच्या माध्यमातून करडी नजर पोलिसांची असणार आहे. यंदाचा गणेशोत्सव डीजेमुक्त साजरा करा, असे आवाहन श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर यांनी केले.
नेवासे पंचायत समितीच्या सभागृहात नेवासे पोलिस स्टेशनच्या वतीने आयोजित तालुक्यातील शांतता समितीचे सदस्य, गणेश मंडळाचे कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधताना भोर बोलत होत्या.
यावेळी नेवासे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे, नायब तहसीलदार चांगदेव बोरुडे, गटविकास अधिकारी पाटेकर, नगरपंचायत प्रसाशकीय रामदास म्हस्के, होमगार्ड समादेशक आधिकारी बाळासाहेब देवखिळे, नगरसेवक सुनील वाघ, महावितरण अभियंता आधिकारी वैभव कानडे, प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन गायकवाड यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी व मंडळाचे प्रमुख उपस्थित होते.
तर सर्वात आधी पोलिसांशी संपर्क साधावा
गणेश मंडळ व शांतता समितीच्या कार्यकत्यांनी मिरवणूक मार्गावर येणारे अडथळे, मोकाट जनावरांचा त्रास तसेच विद्युत पुरवठा खंडीत न होण्याबाबत मागण्या मांडल्या. यावेळी उपस्थित संबधित खात्यांच्या अधिकाऱ्यांना याबाबत लगेच तत्परता दाखवण्यासाठी योग्य नियोजन करा, अशा सूचना अप्पर पोलिस अधीक्षकांनी केल्या. समाजात तेढ निर्माण करणारे मेसेज पडतील, याबाबत कोणतीही भूमिका घेण्या अगोदर पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा. गणेशोत्सव मंडळाने रितसर परवानगी घ्यावी. यंदा मंडळ दत्तक योजना देखील उपलब्ध आहे.
वाहनांची तपासणी, रस्त्यातील अडथळा दूर करा
विसर्जनावेळी वाहनांची योग्य तपासणी करून घ्यावी. नगरपंचायतीने रस्त्यात अडथळे दूर करावा व सर्वांनी शांततेच्या मार्गाने गणेशोत्सव साजरा करा, असे आवाहन केले. नेवाशाचा गणेशोत्सव डीजे मुक्त असावा तसेच युवकांनी सोशल मीडिया जपून वापरावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे यांनी केले. यावेळी बहुजन समाजाचे नेते संजय सुखदान, मुस्लिम समाजाचे नेते ईमरानभाई दारुवाले, ज्येष्ठ नेते गफूरभाई बागवान, अजित नरुला, मनसेचे संतोष गव्हाणे, सहकार सेनेचे बालेंद्र पोतदार, स्वप्नील मापारी यांनी सूचना केल्या. तालुक्यातील पोलिस पाटील व सरपंच, विविध संस्थेचे पदाधिकारी व मंडळाचे अध्यक्ष व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
सूत्रसंचालन पत्रकार सुधीर चव्हाण यांनी केले. आभार समादेशक आधिकारी बाळासाहेब देवखिळे यांनी मानले.