ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

अहिल्यानगर प्रतिनिधी - संगीता खिलारी

मुंबई राज्यातील तापमान लक्षणे वाढला वाढ झालेली असतानाच हवामान विभागाने काही विभागांत अवकाळी..

राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुंबई ठाणे आणि पालघर उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि इतर भागांमध्ये 1ते 4एप्रिल दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाचा हलक्या सरी कोसळतील तसेच गारपिटही होण्याचे संकेत देत आहे.

शेतकऱ्यांना शेत पिकांची खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. राज्यात एन मार्च महिन्यात उन्हाच्या झळां मुळे अंगाची लाही लाही होत आहे.

एप्रिल आणि मे मध्ये उकाडा आणखीच वाढण्याची चिन्हे असताना हवामान विभागाने एक एप्रिल ते 4 एप्रिल 2025 दरम्यान विजांचा कडकडाटासह राज्यात हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे तसेच 40 ते 50 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता ही वर्तवली आहे एक व दोन एप्रिल रोजी काही ठिकाणी 50 . 60.किमी प्रती तास वेगाने गारपीट होऊ शकते तस असेही हवामान विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

चंद्रपुरात सर्वाधिक 42.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली अकोला 42.3 अमरावती 41.2 यवतमाळ 41.2 वर्धा 41.2 गडचिरोली 41.4 जळगाव चाळीस पॉईंट दोन बीड 41.2 आणि सोलापूर 41 .1 या शहरांमध्ये तापमानाचे उच्चांकी पातळी गाठली..

येलो अलर्ट जारी ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहिल्यानगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली छत्रपती संभाजीनगर येल्लो अलर्ट जारी केला आहे एक एप्रिल ते चार एप्रिल दरम्यान या परिसरात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे तसेच हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून गरज नसल्यास घराबाहेर पडू नये.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे