ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगर म्हाडामध्ये घर आणि दुकान मिळवून देण्याचे आमिष दाखवून नेत्रचिकित्सा अधिकारी महिलेची तब्बल 35 लाख 30 हजार 122 रुपयांची फसवणूक

अहिल्यानगर म्हाडामध्ये घर आणि दुकान मिळवून देण्याचे आमिष दाखवून जिल्ह्यातील एका ग्रामीण रूग्णालयात नेत्रचिकित्सा अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या महिलेची तब्बल 35 लाख 30 हजार 122 रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुळच्या छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी व सध्या नगर जिल्ह्यातील एका ग्रामीण रूग्णालयात नेत्रचिकित्सा अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या 33 वर्षीय महिलेने शुक्रवारी (10 एप्रिल) रात्री पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिलीप भंडारी, धनराज भंडारी, कुसुम भंडारी, अशोक चोपडा व संगीता चोपडा (सर्व रा. सिव्हिल हाडको, अहिल्यानगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

संशयित आरोपींनी फिर्यादी महिलेला म्हाडामध्ये घर तसेच व्यावसायिक गाळे मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. विश्वास बसावा म्हणून त्यांनी विविध आश्वासने देत फिर्यादीचा विश्वास संपादन केला. या आमिषाला बळी पडून फिर्यादीने वेळोवेळी रोख, ऑनलाइन व्यवहार आणि धनादेशाद्वारे 26 लाख 52 हजार रुपये संशयित आरोपींना दिले.

ही रक्कम उभी करण्यासाठी फिर्यादी महिलेला बँकेतून कर्ज घ्यावे लागले. त्या कर्जाच्या परतफेडीसाठी त्यांनी आतापर्यंत 8 लाख 78 हजार 122 रुपये भरले आहेत. मात्र, एवढी मोठी रक्कम देऊनही घर किंवा गाळा मिळाला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

फिर्यादीने पैसे परत मागितल्यावर संशयित आरोपींनी टाळाटाळ केली. अखेर महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी फसवणूक व इतर संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवला असून सहायक पोलीस निरीक्षक मंगेश गोटला अधिक तपास करीत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे