
साड्या जुन्या झाल्या किंवा खूपदा त्याच त्याच साड्या वापरुन कंटाळा आला की एकतर त्या साड्या महिला कोणाला तरी देऊन टाकतात किंवा बोहारणीला देऊन त्यावर भांडी घेतात. मात्र कधी कधी काही साड्या इतक्या आवडत्या असतात की त्यांना कोणाला देऊन टाकायचीही इच्छा होत नाही. तसंच, काही साड्यांच्या आठवणीही खास असतात. अशावेळी या जुन्या साड्यांना तुम्ही हटके व ट्रेंडी लुक देऊन पुन्हा परिधान करु शकता. कसं ते जाणून घेऊया.
आईच्या लग्नातील साडी कितीही जुनी झाली तरी ती टाकून द्यावीशी वाटत नाही. अशावेळी ती साडी मुलीकडे किंवा सुनेकडे जाते.
पण खूप वर्ष न वापरल्यामुळं साडी जीर्ण होऊ शकते. अशावेळी ती फेकून देता वेगळ्या पद्धतीनेही तुमच्याकडे ठेवू शकता. वेगळ्या पद्धतीने व थोड्या हटके पद्धतीने तुम्ही या साड्यांचा पुर्नवापर करु शकता.
या फेस्टिव्ह सिझनमध्ये तुम्ही एक वेगळा लुक ट्राय करुन तुमच्या आवडत्या साड्या पुन्हा वापरु शकता.
एथनिक सूटः जुन्या साड्यांचा तुम्ही तुमच्यासाठी स्ट्रेट, ए लाइन किंवा अनारकली सूट शिवून घेऊ शकता. जर तुमच्याकडे बनारसी, कांचीपुरम किंवा पैठणी साड्या असल्यास त्याचे सूट खूप सुंदर दिसतात.