ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

केडगाव येथील हजारो महिला भाविकांना शिर्डी व शनि शिंगणापूर दर्शन…

अहमदनगर प्रतिनिधी

केडगाव येथील हजारो महिला भाविकांना खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या वतीने माजी महापौर संदीप कोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र शिर्डी व शनि शिंगणापूर दर्शन घडविण्यात आले.

केडगाव देवी मंदिरापासून महिला भाविकांसाठी बसची व्यवस्था करण्यात आली होती. या निशुल्क दर्शन सोहळ्याचे प्रारंभ उद्योजक सचिन आबा कोतकर यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले.

यावेळी नगरसेवक मनोज कोतकर, सामाजिक कार्यकर्ते जालिंदर कोतकर, माजी नगरसेविका सविता अशोक कराळे, खासदार विखे यांचे स्विय सहाय्यक अतुल भंडारी, सुनील गमे, स्वानंद महाराज जोशी, बाबासाहेब कोतकर, अनिल ठुबे, सोपान कोतकर, भूषण गुंड, गणेश सातपुते, सागर सातपुते, प्रसाद आंधळे, बच्चन कोतकर, अजित कोतकर, शाम कोतकर, राघू ठूबे, लक्ष्मीकांत घोडके, मनोज येरकर, विजय कराळे, विठ्ठल कोतकर, सचिन सरोदे, संजय चौधरी, संजित क्षीरसागर, स्वप्निल चीपाडे, शिवाजी दिवटे, संतोष लोखंडे, शुभम कोतकर, सोमा कोतकर, अण्णा शिंदे, बंटी विरकर आदींसह भाविक महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

या दर्शन यात्रेच स्वागत राहुरी येथे माजी मंत्री तथा जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांनी केले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रभाजी सुळ, विक्रम तांबे, बाळूनाना बनकर उपस्थित होते. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून महिला भाविकांना मोफत श्री क्षेत्र शिर्डी व शनि शिंगणापूर दर्शन घडविण्याचा उपक्रम सुरु आहे.

केडगाव मधून दोन दिवसात तब्बल 18 लक्झरी बस भरुन महिला भाविक गेल्या होत्या. या उपक्रमाच्या माध्यमातून शिर्डी व शनि शिंगणापूर येथे व्हीआयपी प्रमाणे दर्शन झाले. नाहीतर दर्शनासाठी अनेक तास प्रतिक्षा करावी लागत होती. चांगल्या पध्दतीने दर्शन होवून नाष्टा, जेवणची देखील उत्तम प्रकारे व्यवस्था करण्यात आल्याची भावना महिलांनी व्यक्त केली.

जालिंदर कोतकर म्हणाले की, श्री क्षेत्र शिर्डी व शनि शिंगणापूर दर्शनासाठी केडगावच्या महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सर्व सोयीयुक्त अशी मोफत दर्शन यात्रा नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

यापुढे देखील ही सेवा अविरतपणे सुरु ठेवण्याची भावना त्यांनी व्यक्त केली. सविता कराळे यांनी महिला वर्गाला एकत्रितपणे जाण्याची मिळालेली संधी ही अभूतपूर्व आहे. महिलांवर कुटुंबाची जबाबदारी असल्याने त्यांना आपल्या मैत्रीणींसह घराबाहेर पडता येत नाही. मात्र या सहलीतून मैत्रिणीबरोबर देवदर्शनाचा आनंद लुटता येत असल्याचे सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे