अहमदनगर महाविद्यालयातील पाच संशोधन प्रकल्पांची आविष्कार २०२३ स्पर्धेमध्ये विद्यापीठ पातळीसाठी निवड
अहमदनगर

समाज उपयोगी व नाविन्यपूर्ण संशोधनसाठी दरवर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न आविष्कार या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन केले जाते.
अहमदनगर महाविद्यालयातील इशिका कनोजिया, तुषार माळवदकर, आदित्य दत्ता, रिया तिवारी आणि जागृती महाजनी या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पाच संशोधन प्रकल्पांची आविष्कार २०२३ संशोधन स्पर्धेच्या विभागीय पातळीतून विद्यापीठ पातळी स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
या विद्यार्थ्यांना प्रा. माया उन्डे, प्रा. रविकिरण लाटे, प्रा अभिजित आहेर, प्रा प्रशांत कटके, प्रा. गौरव मिसाळ व प्रा. प्रदिप शेळके शैक्षणिक आणि संशोधन समन्वयक यांनी मार्गदर्शन केले. या महाविद्यालयाच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर. जे.बार्नबस यांनी अभिनंदन करून सत्कार केला.
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ.आर. जे.बार्नबस म्हणाले की संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक महाविद्यालय या स्पर्धेत भाग घेतात त्यातून अहमदनगर महाविद्यालयातील पाच संशोधन प्रकल्पांची निवड झाली आहे.
हे महाविद्यालयासाठी कौतुकाची बाब आहे. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन दिल्यानेच आज अहमदनगर महाविद्यालय विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होत आहे, असे सांगून यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या