सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूल ठरली सलग दुसऱ्या वर्षी सर्वाधिक पारितोषिकांची मानकरी
अहमदनगर प्रतिनिधी

अहमदनगर मधील तक्षिला विद्यालयात शनिवार दिनांक १२ ऑगस्ट २०२३ रोजी आंतरशालेय विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
यात अहमदनगर मधील २० शाळांनी सहभाग नोंदवला. त्यामधून सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूल सर्वाधिक पारितोषिकांची मानकरी ठरली.
या विविध स्पर्धांमध्ये फॅन्सी ड्रेस, समूह गायन, स्पेलर चॅम्प, मनोॲक्ट, टिशू पेपर आर्ट, मंडला आर्ट, रिदम अँड राईम, ओरिगामी आर्ट, कार्टून ॲक्ट तसेच लघुनाटिका, टेक इंडिया यासारख्या अनेक स्पर्धांमध्ये शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. या विविध स्पर्धांमधून विवेकानंद शाळेने दहा बक्षिसे मिळवून सर्वाधिक पारितोषिकांची मानकरी बनण्याचा किताब सलग दुसर्या वर्षी प्राप्त केला.
या आंतरशालेय स्पर्धांमधून मनस्वी बापटे, आरुषी पवार, मायरा शेख, स्पंदन राळेभात, स्वानंदी महाजन, स्वरा येवलेकर, दिशा डोडेजा, आर्यन निकम, मधवेश येरी ओम अंदानी, ओनकार राशिनकर, पार्थ कुलकर्णी, धन राजहंस, अर्चित सराफ, अमोघ पलसकर, क्रिष्णा खराडे, शौर्य धोकले, शौनक कुलकर्णी आणि आदिश खोले या सर्व विद्यार्थ्यांनी बक्षीसे पटकावली.
या सर्व विद्यार्थ्यांना माध्यमिकच्या प्राचार्या गीता तांबे, प्राथमिकच्या प्राचार्या सौ. गोदावरी किर्तानी आणि पूर्व प्राथमिकच्या प्राचार्या सौ. कांचन पापडेजा यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. दामोधर बठेजा तसेच सदस्य श्री. रूपचंद मोटवानी, श्री. दामोदर माखिजा, श्री. रामचंद मेंघानी, श्री. महेश मध्यान, श्री. राजू गुरुनानी , श्री. सुरेश हिरानंदानी, श्री. हरीश मध्यान,श्री. गोपाल भागवानी यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व शाळेच्या या यशाबद्दल सर्व विद्यार्थी , शिक्षक आणि पालक यांचे अभिनंदन केले.
या स्पर्धेसाठी शालेय सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. अश्विनी देशपांडे व शिरीन शेख तसेच सौ पूजा चोपडा, सौ. चांदनी सोनग्रा, सौ. अनामिका म्हस्के, वेरोनिका कोरेरा, श्री गुंजाळ, सौ. आशा रंगलानी, श्री मनिष अहुजा, सुमन कदम, सौ. रूचिता सारडा, सौ. दिव्या पोखरणा, सौ. इशरत शेख, सौ. गीता दुमाटे यांनी परिश्रम घेतले.