गुन्हेगारीब्रेकिंग
हॉटेलची तोडफोड, जाळपोळ करत चालक व कामगारांवर खुनी हल्ला, १४ जणांवर गुन्हा
अहमदनगर

हॉटेल चालकाशी २ दिवसांपूर्वी झालेल्या वादाच्या रागातून तरुणांच्या जमावाने हॉटेलची तोडफोड, जाळपोळ करत चालकासह तेथील २ कामगारांना लाकडी दांडके, लोखंडी रॉड ने बेदम मारहाण करत एकाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नगर तालुक्यातील अकोळनेर – सारोळा कासार रस्त्यावर असलेल्या हॉटेल निवांत येथे सोमवारी (दि.२५) रात्री घडली.
याबाबत हॉटेलचालक राजु मुक्ताजी सुंबे (रा. सोनेवाडी, ता.नगर) यांनी शुक्रवारी (दि.२६) सायंकाळी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी सुंबे यांचे अकोळनेर – सारोळा कासार रस्त्यावर दोन्ही गावांच्या शिवेलगत हॉटेल निवांत नावाचे हॉटेल आहे. या ठिकाणी रविवारी (दि.२४) मध्यरात्री काही तरुणाचे हॉटेल मधील कामगार व फिर्यादी सुंबे यांच्याशी वाद झाले होते.