ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

माजलगाव मध्ये भाजपा लोकसभा विस्तारकाचा भर दिवसा खून धारदार शस्त्राने..

अहिल्यानगर प्रतिनिधी - संगीता खिलारी

माजलगाव शहरातील स्वामी समर्थ मंदिराच्या पाठीमागे असलेल्या भाजपा कार्यालयासमोर सोमवारी (दि.15) भर दिवसा तरुणाची हत्या करण्यात आली. बाबासाहेब प्रभाकर आगे (रा. किट्टी आडगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. आरोपी नारायण शंकर फपाळ याने हे कृत्य केले असून तो स्वतःहून शहर पोलीस ठाण्यात हजर झाला.

मिळालेल्या माहितीनुसार आरोपीचा बाबासाहेब आगे यांचे सोबत वाद होता. आरोपी दोन महिन्यापासून त्यांच्या मागावर होता. दरम्यान आज त्यांची समोरासमोर भेट झाल्याने कोयत्याने त्यांच्यावर वार करत बाबासाहेब आगे यांची हत्या केली.

यानंतर आरोपी स्वतः पोलीस स्टेशनला हजर झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मयत आरोपी हा भाजपचा लोकसभा बूथ विस्तारक आहे. दिवसा ढवळ्या घडलेल्या या घटनेने माजलगाव हादरून गेले आहे. हत्या करतानाचा व्हिडिओ देखील प्रचंड व्हायरल झाला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे