ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक
खा. विखेंनी घेतले अयोध्येत रामलल्लाचे दर्शन, नगरमधील महिलांनी तयार केलेला प्रसाद लाडू अर्पण
अहमदनगर

खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या जन्मभूमीत जाऊन मनोभावे दर्शन घेतले. यावेळी रामलल्लाच्या तेजस्वी मूर्तीचे दर्शन घेऊन कृतकृत्य झालो अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
विशेष म्हणजे जिल्ह्यातील माता भगिनींनी आपुलकीने बनवलेला प्रसादाचा लाडू प्रभू श्रीरामांच्या पुढे ठेवण्यासाठी अयोध्येत येण्याचे भाग्य मला लाभले याचा विशेष आनंद होत आहे.
मला विश्वास आहे की या लाडूंच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील माझ्या माता भगिनींनी केलेल्या सर्व प्रार्थना आणि मनोकामना पूर्ण होतील.
सर्वांना सुखी समाधानी आयुष्य लाभो अशी प्रभू श्रीरामांच्या चरणी प्रार्थना!