ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

महाराष्ट्र शासनाच्या औद्योगिक आणि आरोग्य विभागाच्या सहाय्यक संचालक पदी श्रीनिवास सब्बन यांची निवड

अहमदनगर - पद्माशाली समाजातील गरीब कुटुंबातील श्रीनिवास सब्बन महाराष्ट्र राज्य सेवा आयोग उत्तीर्ण

पद्माशाली समाजातील अत्यंत गरीब कुटुंबातून श्रीनिवास याने महाराष्ट्र शासनाची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन त्याची नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या औद्योगिक आणि आरोग्य विभागाच्या सहाय्यक संचालक पदी निवड झाली ही पद्माशाली समाजासाठी गौरवाची बाब आहे.

श्रीनिवास याचे वडील चहा चा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाची उपजीविका चालवीत असे, आई बिडी काम करीत होते कुटुंबातील दोन मुले दोन मुली असे संपूर्ण कुटुंबाचे शिक्षण श्रीनिवास च्या वडिलांनी चहाचा व्यवसाय करून सर्व मुलांना उच्चाशिक्षित शिक्षण दिले. लहान भाऊ मयूर हा सॉफ्टवेअर इंजिनियर होऊन परदेशात आमस्टारड्यम मध्ये नोकरीस आहे.

श्रीनिवास याने आई वडिलांचे कष्टाचे फळ करण्याचे उद्देशाने रात्र दिवस काम करून अभ्यास करून इंजिनिअरिंग करून एम बी ए केले त्या नंतर अहमदनगर येथील एम आय डी सी मध्ये कमिन्स कंपनी मध्ये नोकरीं करून महाराष्ट्र शासनाची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाला व त्याची आता महाराष्ट्र शासनाच्या औद्योगिक आणि आरोग्य विभागाच्या सहाय्यक संचालक पदी निवड झाली म्हणून त्याचे पदमशाली समजामध्ये सर्वत्र अभिनंदन होत आहे.

श्रीनिवास याची पत्नी पद्मिनी ही सुद्धा उच्चाशिक्षित असून अहमदनगर येथील एम एस आर टी सी मध्ये नोकरीस आहे. श्रीनिवास याचे निवडी बद्दल पदमशाली समाजामध्ये त्याचा मोठा गौरव होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे