अहमदनगरमध्ये कोरोनाच्या जेएन १ व्हेरिएंटचा शाळेतल्या दोन विद्यार्थ्यांना बाधा
अहमदनगर

कोरोनाने पहिल्या दोन लाटेमधे अहमदनगर जिल्ह्यात खूप धुमाकूळ घातला होता. परंतु लसीकरणानंतर मात्र नंतर याचा प्रभाव जाणवला नाही. परंतु सध्या महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढीस लागले आहेत.
त्यात जेएन १ व्हेरिएंटचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे. आता अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आले आहेत. शाळेत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याने खळबळ उडाली असून आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे.
सतर्क राहणे हाच उपाय
महाराष्ट्रात जेएन १ हा नवीन व्हेरिएंट हळूहळू पसरत आहे. अनेक भागात रुग्ण आहेत. या व्हेरिएंटने अधिक धोका नसला तरी सतर्क राहणे हाच उपाय असल्याचे सध्या आरोग्य यंत्रणा सांगत आहे.
अहमदनगर मध्ये देखील या व्हेरिएंटने शिरकाव केला आहे. याने दोन विद्यार्थी कोरोना बाधित झाले असल्याची माहिती मिळाली आहे.
कशी आहे विद्यार्थ्यांची स्थिती?
कोरोना बाधित झालेल्या या दोन्ही विद्यार्थ्यांची स्थिती जास्त काळजी करण्यासारखी नाही. त्या दोघांनाही सर्दी, खोकला आदी लक्षणे होती. त्यामुळे त्यांची रॅपिड अँटीजेन तपासणी केली व यात हे विद्यार्थी कोरोना बाधित असल्याचे समजले. या विद्यार्थ्यांमध्ये माइल्ड सिम्टन्स असल्याने त्यांना कोणताही धोका नसल्याचे सांगण्यात येत आहे.