
स्वास्थ्य व निरोगी आरोग्याचा संदेश देण्यासाठी ४ फेब्रुवारी रोजी होत असलेल्या मॅक्सिमस नगर रायझिंग हाफ मॅरेथॉनच्या नोंदणीसाठी ५ जानेवारीपर्यंत विशेष ऑफर देण्यात येत आहे. ही मॅरेथॉन ४, १० व २१ किलोमीटर या तीन गटांत होणार आहे.
जीवनात वाढते ताण-तणाव, आरोग्याचे प्रश्न गंभीर बनत असताना शहरात आरोग्य चळवळ रुजविण्यासाठी मॅक्सिमस नगर रायझिंगच्यावतीने मॅरेथॉनच्या माध्यमातून जागृती केली जात आहे.
शहरात नगर रायझिंग फाउंडेशनच्यावतीने फाउंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांच्या संकल्पनेतून आठव्या मॅक्सिमस नगर रायझिंग मॅरेथॉन स्पर्धेचे रविवारी (४ फेब्रुवारी) आयोजन करण्यात आले आहे.
या हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी ५ जानेवारीपर्यंत विशेष ऑफर देण्यात येत आहे. तरी या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन नगर रायझिंगच्यावतीने करण्यात आले आहे.