ब्रेकिंगमहाराष्ट्र
ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांचे निधन
पुणे - हृदयविकाराच्या झटक्याने 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, शास्त्रीय संगीताचा अनुभवी सूर हरपला..

ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे शनिवारी पहाटे पुण्यातील त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या 92 वर्षांच्या होत्या.
प्रभा अत्रे यांचे गायकीसोबतच ठुमरी, गझल, उपशास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, भजन व भावसंगीत गायकीवरही प्रभुत्व होते. त्यामुळे त्यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रातील एक अनुभवी सूर हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.