ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या नातवाचे अपघाती निधन

अहमदनगर

दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे नातू अमित स्मिता बन्सी सातपुते यांचे काल रात्री आठ वाजताच्या सुमारास अपघाती निधन झाले.

त्यांचे वय ३३ वर्ष होते. ते पोल्ट्री व्यावसायिक होते. भारतीय महिला फेडरेशनच्या राज्याध्यक्षा कॉ. स्मिता व भारतीय कम्युनिस्ट पक्ष जिल्हा सचिव कॉ. ॲड. बन्सी सातपुते यांचे ते पुत्र होत.

अहमदनगर जिल्ह्यातील भेंडा येथे स्कॉर्पिओ गाडीने धडक देऊन चालक गाडीसह पसार झाला होता. अपघातास कारणीभूत ठरलेले स्कॉर्पिओ वाहन नागरिकांनी पकडलेले. अमित यांचे पार्थिव शव विच्छेदनासाठी नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. अमित यांच्या डोक्यावरुन वाहनाचे चाक गेल्याने ते जागीच ठार झाले.

भेंडा (ता. नेवासा) येथे व्यंकटेश ज्वेलर्स दुकानासमोर दोन वाहनांचा अपघात झाला होता. यात दुचाकीवरील अमित बन्सी सातपुते (वय ३३, रा. नजीक चिंचोली, ता. नेवासा) यांचे निधन झाले. ही घटना रविवारी (दि.२२) रात्री ८:३० वाजेच्या सुमारास घडली.

मयत अमित हे कॉम्रेड बन्सी सातपुते, कॉम्रेड स्मिता पानसरे यांचे एकुलता एक सुपुत्र, तर ज्येष्ठ विचारवंत दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे नातू होते. रविवारी रात्री अमित सातपुते हे नेवासा- शेवगाव राज्य मार्गावरून दुचाकीवरून नजीक चिंचोली येथून नेवासा फाटा येथे येत होते. भेंडा येथे त्यांना एका वाहनाने धडक दिली.

अमित यांच्या डोक्यावरून वाहनाचे चाक गेल्याने ते जागीच ठार झाले. त्यानंतर पोलिसांनी एका ट्रॅक्टर चालकास पकडले. ट्रॅक्टर चालकाने तरुणाच्या दुचाकीला स्कॉर्पिओने धडक देऊन तो पसार झाल्याचे सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे