ब्रेकिंगमहाराष्ट्र
लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरपासून मिळणार
मुंबई - 'मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण' योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांना २९ सप्टेंबर पासून 'डीबीटी'द्वारे थेट बँक खात्यात हस्तांतरित करण्यात येणार..

महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी महायुती सरकारने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांना २९ सप्टेंबर पासून ‘डीबीटी’द्वारे थेट बँक खात्यात हस्तांतरित करण्यात येणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
या निमित्ताने रविवार २९ सप्टेंबर रोजी राज्यातल्या रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण’ योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम होणार आहे.