ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

एकोणतीस वर्षानंतर श्री मार्कंडेयच्या सवंगड्यांचा पुन्हा भरला गणिताचा जादा तास.

अहमदनगर - 1994 च्या बॅच च्या माजी विद्यार्थ्यांचा 29 वर्षांनी स्नेह मेळावा

येथील पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाच्या श्री मार्कंडेय विद्यालय 1994 च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहबंधनाचा कार्यक्रम गांधी मैदानातील शाळेत व नंतर संजोग लॉन्स येथे आयोजित करण्यात आला होता.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष , श्री मार्कंडेय विद्यालयाचे माजी प्राचार्य व पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष बाळकृष्ण सिद्दम सर यांचा गणिताचा ज्यादा तास आयोजित करण्यात आला होता आणि यावेळी समोर बसले होते डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, वकील ,व्यापारी तसेचशैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात मोठ्या मोठ्या पदांवर काम करणारे प्रौढत्वाकडे झुकलेले विद्यार्थी आणि विद्यार्थीनी. तब्बल 29 वर्षांनी आपल्या सवंगड्यांसह आपल्या लाडक्या शिक्षकांच्या तासात विद्यार्थी आपले वय, पद, प्रतिष्ठा विसरून हरवून गेले, रंगून गेले.

“साडेतीन दशके अध्यापनाचे काम करत असतांना शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनींना घडवीले, पण अजूनही कोणा माजी विद्यार्थिनीला भेटून माहेरी आलेल्या आपल्या लेकीला भेटल्याचा तर विद्यार्थ्यांना भेटून दिवाळीसाठी सासरी आलेल्या जावयाला भेटल्याचा आनंद होतो…!!” कितीही गुगल येऊदेत व त्याला चालवण्यासाठी 3g,4g,5g येऊदेत पण गुरुजींची जागा कोणीही घेऊ शकत नाही कारण विद्यार्थी घडविण्याचे कार्य फक्त आणि फक्त गुरु “जी” च करू शकतात असे माजी प्राचार्य श्री बाळकृष्ण सिद्दम सर आपल्या अध्यक्षीय मनोगतात म्हणाले.

प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणाऱ्या शिक्षकांच्या वतीने मनोगतात, “आयुष्यभर लक्षात राहावा असा सुंदर कार्यक्रम झाल्याचे व श्री मार्कंडेयच्या माजी विद्यार्थ्यांनी सर्वच क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवल्याने या सर्व विद्यार्थ्यांचा आम्हां शिक्षकांना अभिमान वाटतोय असे आपल्या मनोगतात माजी प्राचार्य बाळकृष्ण गोटीपामुल सर म्हणाले.

विद्यार्थी घडविण्याचे कार्य शिक्षक करतात आणि त्यातून निर्माण झालेले चांगले विद्यार्थी हा देश घडविण्याचे कार्य करू शकतात असे माजी प्राचार्य क्षेत्रे सर आपल्या मनोगतात म्हणाले, यावेळी श्री जोगदे सर, सौ.जानोरकर मॅडम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमासाठी शाळेतील माजी शिक्षक श्री यन्नम सर, श्री इटेवाड सर, श्री मुदिगंटी सर, सौ जहागीरदार मॅडम, सौ अरकल मॅडम, सौ आडम मॅडम, सौ आरोळे, सौ भिंगरदिवे मॅडम, सौ जोगदे मॅडम, सौ मुदिगंटी मॅडम, सौ पाटसकर मॅडम, सौ सानम मॅडम, सौ ठाकर मॅडम, सौ लोखंडे मॅडम, सौ गायकवाड मॅडम, सौ येनगंदुल मॅडम, सौ गोसके मॅडम उपस्थीत होते.

श्री मार्कंडेय विद्यालयातील गणिताच्या तासानंतर चहा नाश्ता करून सर्व विद्यार्थी आणि शिक्षक संजोग लॉन्स येथे पुढील कार्यक्रमासाठी आले असता विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ढोल ताशा व तुतारींच्या नादामध्ये आपल्या सर्व प्रिय गुरुजनांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व दिवंगत माजी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी, विद्यार्थिनींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यानंतर कार्यक्रमाची सुरुवात सर्व सन्माननीय शिक्षक शिक्षिका यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली, कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. गणेश माळी यांनी केले.

सर्व गुरुजनांचे शॉल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आले, यावेळी विद्यार्थ्यांमधून प्रा.डॉ. श्रीनिवास भोंग व स्नेहल वैद्य मानकर यांनी आपल्या मनोगतात आपल्या शालेय जीवनातील विविध आठवणींना उजाळा देत आपल्या शाळा व शिक्षकांन विषयी आदरभाव व्यक्त केले. आभार प्रदर्शन करताना आयोजित कार्यक्रमात आपल्या वयाचे 75 ते 80 जवळ असलेले सर्व शिक्षक वयाचेभान विसरून विद्यार्थ्यांच्या प्रेमापोटी दिवसभर कार्यक्रमात उपस्थित राहिल्याबद्दल तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपला बहुमूल्य वेळ देऊन राबलेल्या व आर्थिक योगदान दिलेल्या सर्वांचे ज्ञानेश्वर मंगलारम यांनी आभार व्यक्त केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन जावळे, वैशाली ताटी यांनी केले.

या सर्व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी त्रिलेश येनगंदुल, ज्ञानेश्वर मंगलारम, गणेश माळी ॲड.निलेश हराळे, ओमसिंग बायस, नीलेश डेंगळे, सतीश आकेन,संतोष भवर, मनोज जेटला, महेंद्र तरवडे,संतोष घोरपडे, अमोल टेमक,शरद बोरुडे, नदीम सय्यद,विजय मच्चा, संतोष पाटसकर,वंदना वाघमारे,वैशाली कुरापट्टी , मनिषा रामदिन , अक्षरा ढुंमणे, आदींनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे