ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

मीना कांबळी शिवसेनेत

मुंबई

उपनेत्या मीना कांबळी यांनी उद्धव गटाला अखेरचा जय महाराष्ट्र केला आणि शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीना कांबळी यांचे पक्षात स्वागत केले. मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर झालेल्या सोहळ्यात मीना कांबळी यांनी पक्षप्रवेश केला.

उद्धव गटाने पक्ष विस्तारासाठी कार्यकारिणीचा विस्तार केला. प्रामुख्याने मुंबई – ठाणे पट्ट्यातील नेत्यांना प्राधान्य देण्यात आले. पण राज्याच्या उर्वरित भागांतील पदाधिकाऱ्यांना पुरेशी संधी दिलेली नाही. यामुळे उद्धव गटात प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. काही महिला पदाधिकारी फारच नव्या असूनही त्यांना पक्षात भरपूर महत्त्व दिले जात आहे. याउलट आधीपासून काम करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. यातूनच निर्माण झालेल्या नाराजीतून उपनेत्या मीना कांबळी यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे