ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

पद्मशाली सोशल फाउंडेशन ट्रस्टचा समाजोपयोगी उपक्रम – विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ

अहिल्यानगर

पद्मशाली सोशल फाउंडेशन ट्रस्ट, अहिल्यानगर यांच्या वतीने श्री मार्कंडेय शैक्षणिक संकुल येथे शहरातील विविध शाळांमधील १५० गरजू विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमाचा लाभ श्री मार्कंडेय प्राथमिक विद्यालय (श्रमिकनगर), दादा चौधरी मराठी शाळा, दादा चौधरी विद्यालय, महात्मा फुले विद्यामंदिर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (उक्कडगाव), प्रगत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कै. वि. ल. कुलकर्णी प्राथमिक शाळा, बालक मंदिर महिला मंडळ, सिताराम सारडा माध्यमिक विद्यालय, मनोहरलाल रामचंद्र सबलोक प्राथमिक विद्यालय, शारदा विद्यामंदिर, १०८ श्री महंत पंडित सुच्चासिंगजी महाराज माध्यमिक विद्यालय, श्रीमती पार्वतीबाई डहाणूरकर कन्या विद्यालय आणि महर्षी ग. ज. चितांबर विद्यामंदिर येथील विद्यार्थ्यांना देण्यात आला.

गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमातून आतापर्यंत १,५०० विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप करण्यात आले असून, गरजू विद्यार्थ्यांचे शिक्षण आर्थिक अडचणींमुळे खंडित होऊ नये, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे