ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

अहिल्यानगर महाकरंडक २०२५ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा रंगणार १६ ते १९ जानेवारीला

अहिल्यानगर

महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि मानाची एकांकिका स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी ‘अहिल्यानगर महाकरंडक २०२५’ ही राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा येत्या १६ ते १९ जानेवारी २०२५..

महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि मानाची एकांकिका स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी ‘अहिल्यानगर महाकरंडक २०२५’ ही राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा येत्या १६ ते १९ जानेवारी २०२५ दरम्यान अहिल्यानगर येथील माऊली सभागृहात आयोजित केली जाणार आहे.

या स्पर्धेचे १२वे वर्ष आहे आणि गेल्या ११ वर्षांपासून ‘अहमदनगर महाकरंडक’ म्हणून ओळखली जात असलेली ही स्पर्धा आता ‘अहिल्यानगर महाकरंडक’ नावाने ओळखली जाईल.

स्पर्धेचे ब्रीदवाक्य ‘उत्सव रंगभूमीचा, सोहळा शिवराज्याभिषेकाचा’ ठेवण्यात आले आहे..

कारण यंदा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५१ वर्षे पूर्ण होणार आहेत. अनुष्का मोशन पिक्चर्स अ‍ॅण्ड एंटरटेन्मेंट, शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाऊंडेशन आणि श्री महावीर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन केले आहे, तर झी युवा वाहिनी या स्पर्धेचा प्रायोजक आहे.

या स्पर्धेने अनेक मोठ्या कलावंतांना व्यासपीठ दिले असून, अनेक कलाकारांनी या स्पर्धेत भाग घेऊन चित्रपट, मालिका आणि ओटीटी माध्यमांत आपले स्थान निर्माण केले आहे.

स्पर्धेत प्रमुख पाहुणे म्हणून मराठी चित्रपटसृष्टीतील बिग बॉस अभिनेते महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, स्वप्नील जोशी आणि इतर प्रसिद्ध कलाकार आणि निर्माते उपस्थित राहणार आहेत.

यावर्षी स्पर्धेत प्रथम येणाऱ्या संघाला ₹ १,५१,१११/- रुपये रोख पारितोषिक आणि अहिल्यानगर महाकरंडक प्रमाणपत्र देण्यात येईल.

स्पर्धेतील आकर्षक बक्षिसे आणि शानदार आयोजनामुळे ‘अहिल्यानगर महाकरंडक’ राज्यातील एकांकिकांसाठी एक महत्त्वपूर्ण मंच बनला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे