
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे अधिकमास निमित्त सहस्त्रब्राह्मण भोजनाचा अनोखा कार्यक्रम पुण्यामध्ये आयोजित करण्यात आला.
धुंडीराज गणेशाचा हा महिना असून मंदिरातील अतिरुद्र, चतुर्वेद स्वाहाकार, श्री गणेश सहस्त्रनाम कोटी अर्चना याचा समारोप ब्राह्मण भोजनाने झाला.
मुकुंदनगरमधील शिवशंकर सभागृह येथे झालेल्या सहस्त्रब्राह्मण भोजनास पुण्यातील १०२१ ब्राह्मण उपस्थित होते.
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनिल रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, मंगेश सूर्यवंशी, यतिश रासने, इंद्रजीत रायकर, राजाभाऊ पायमोडे, राहुल चव्हाण, महादेव पवार, सचिन आखाडे, विनायक रासने, विलास रासकर, अंकुश रासने, स्वप्नील फुगे, जितेंद्र चिंचोरकर, संतोष रसाळ यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच, पं. वसंतराव गाडगीळ, घनपाठी वेदमूर्ती प्रकाश दंडगे, जांभेकर गुरुजी, वेदमूर्ती धनंजय घाटे, वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले यांचे शिष्यवर्ग, वेदमूर्ती नटराज शास्त्री, वेदमूर्ती मिलिंद राहुरकर, सद्गुरु ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष यशवंत कुलकर्णी, वेदमूर्ती अजिंक्य जोशी, ओंकार पांडे, वैभव जोशी, वल्लभ कुलकर्णी, सुरेंद्र रोपळेकर, राजेंद्र पांडे, वासुदेव जोशी यांसह ॠग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अर्थववेदाचे गुरुजी, ५ बटू सहभागी झाले होते.
पारंपरिक पद्धतीने हे भोजन देण्यात आले. केळीच्या पानावर ३ पंक्तींमध्ये भोजनाचा कार्यक्रम आयोजिण्यात आला होता. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे अशा प्रकारचा कार्यक्रम पहिल्यांदाच घेण्यात आला. या कार्यक्रमास चारही वेदांचे अध्ययन करणा-या गुरुजींनी मोठया संख्येने उपस्थिती लावली.