ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

जयंत पाटलांचा लवकरच भाजपात प्रवेश ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (शरद पवार गट) भाजपाच्या वाटेवर आहेत, अशी चर्चा अनेक दिवसापासून आहे. भाजपचे खासदार संजय पाटील यांनी जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत सांगलीत सूचक विधान केले आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते.

“भाजपाच्या होकायंत्रांचा इशारा असून लवकरच जयंत पाटलांचा प्रवेश होईल,” अशा शब्दात खासदार संजय पाटीलांनी जयंतरावांच्या भाजप प्रवेशाचे सुतोवाच केले आहे.

महापालिका क्षेत्रातील जयंत पाटील गटाचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी अजित पवार गटात दाखल झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये जयंत पाटील कुठे जाणार ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. “जयंत पाटलांचा भाजपा प्रवेश होईल,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. यावेळी कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्यासह भाजपाचे नगरसेवक उपस्थित होते. काही दिवसापूर्वी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी जयंत पाटील यांच्याबाबत मोठा दावा केला होता “जयंत पाटील भाजपाच्या वाटेवर आहेत. लवकरच ते मार्गक्रमण करतील,” असं वक्तव्य शिरसाट यांनी केलं होतं. त्यावर जयंत पाटलांनी प्रतिक्रिया दिली होती. “संजय शिरसाटांपेक्षा माझी क्रेडिबिलिटी जरा जास्त असेल नाही का? त्यांनी मांडलेल्या मुद्द्यावर तुम्ही माझी प्रतिक्रिया घेणं म्हणजे जरा जास्तच झालं,” असे ते म्हणाले होते.

दरम्यान याआधी देखील गृहमंत्री अमित शाह पुण्यात असताना अजित पवार यांनी जयंत पाटलांची त्यांच्याशी भेट घडवून आणल्याचे वृत्त अनेक प्रसिद्धी माध्यमांनी दिले होते. यावेळी देखील जयंत पाटलांच्या प्रवेशाची चर्चा सुरु झाली होती. यावर जंयत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली होती. “माझ्याविषयी गैरसमज पसरवू नका. मी शाहांना भेटलो याचे काही पुरावे आहेत का? मी संध्याकाळी आणि आज सकाळी पवारसाहेबांसोबत होतो. रात्री दीड वाजेपर्यंत अनिल देशमुख, राजेश टोपेंसोबत बैठकीत होतो. माझ्यासाठी मनोरंजन आहे, असे जयंत पाटील म्हणाले होते.

“मी माझ्याच घरी आहे. तुम्हीच बातम्या करतायत, तुम्हीच खुलासे करा. आमच्या पक्षवाढीसाठी बैठका सुरू आहेत. माझ्यावर कुणाचा दबाव नाही. मला कुणी सांगितलेले नाही किंवा मी असं काही बोललेलो नाही. कुणाशीच चर्चा झालेली नाही. मी दररोज पवारसाहेबांना भेटतोय. माझी रोज करमणूक सुरू आहे. त्यात काल दुपारी भर पडली. आज सुरू आहे. महाराष्ट्रात माझ्याविषयी गैरसमज पसरवणारी आहे. हे योग्य नाही”, अशी भूमिका जयंत पाटील यांनी मांडली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे